दिनांक ०४-०३-२०२१ चालू घडामोडी सराव चाचणी (QUIZ)

 


1) ‘सत्तरीय नृत्य’ संदर्भात खालील योग्य विधान ओळखा

अ) सत्तरीय नृत्य हे आठ मुख्य भारतीय शास्त्रीय नृत्यांपैकी एक आहे

ब) १५ व्या शतकात आसाममधील कवी-संत माधवदेवांनी यांनी सुरू केलेल्या वैष्णव चळवळीचा एक भाग म्हणून सत्तारियाचा जन्म मठात झाला.

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ आणि ब

D) दोन्हीही अयोग्य

 

 

2) प्रभात शर्मा यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या संदर्भात खालील योग्य विधान ओळखा

अ) आसामचे पारंपरिक संगीत जपल्याबद्दल, २००३ मध्ये त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ मिळाला होता.

ब) ‘सत्तरीय नृत्या’विषयी त्यांनी कोणाच्याही मदतीविना संशोधन सुरू ठेवले होते.

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ आणि ब

D) दोन्हीही अयोग्य

 

 

3) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी/नोंदणीपुस्तक (एनपीआर) संदर्भात योग्य विधान ओळखा

अ) नागरिकत्व कायदा १९५५ च्या तरतुदींनुसार आणि नागरिकत्व नियम, २००३ अन्वये नोंदणी केली जाते.

ब) भारतातील प्रत्येक सामान्य नागरिकाने एनपीआरमध्ये नोंदणी करणे बंधनकारक नाही.

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ आणि ब

D) दोन्हीही अयोग्य

 

 

4) नाग नदी संदर्भात योग्य विधान ओळखा

अ) १८व्या शतकात गोंड राजा बख्त बुलंद शाहने नाग नदीच्या काठावर राजधानी म्हणून नागपूर शहर वसवले.

ब) नाग नदी ही भिवकुंड टेकडीजवळ पेंच नदीला मिळते.

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ आणि ब

D) दोन्हीही अयोग्य

 

 

5) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच देशाचे पहिले अभियांत्रिकी संशोधन व विकास धोरण जाहीर केले आहे?

A) महाराष्ट्र

B) तामिळनाडू

C) पश्चिम बंगाल

D) कर्नाटक

 



 

6) राष्ट्रीय वन्यजीव मंडळ संदर्भात योग्य विधान ओळखा

अ) राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष केंद्रीय पर्यावरण मंत्री असतात.

ब) वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अन्वये स्थापन केलेली ही वैधानिक संस्था आहे.

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ आणि ब

D) दोन्हीही अयोग्य

 

 

7) लोकसभा टीव्ही (एलएसटीव्ही) आणि राज्यसभा टीव्ही (आरएसटीव्ही) चे विलीनीकरण करून खालील कोणती एकच वाहिनी/टीव्ही चॅनेल सुरु केले जाणार आहे?

A) भारत टीव्ही

B) हिंदुस्थान टीव्ही

C) संसद टीव्ही

D) लोकप्रभा टीव्ही

 

 

8) “डेजर्ट फ्लॅग VI”  संदर्भात खालील अयोग्य विधान ओळखा

अ) डेझर्ट फ्लॅग हा संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई दलाद्वारे होणारा वार्षिक बहु-राष्ट्रीय युद्ध सराव आहे.

ब) भारतीय वायुसेना प्रथमच डेझर्ट फ्लॅग या वार्षिक बहु-राष्ट्रीय युद्ध सरावामध्ये भाग घेत आहे

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ आणि ब

D) दोन्हीही योग्य

 

 

9) खालील कोणते राज्य/केंद्र शासित प्रदेश हे व्यक्तीच्या कार्बन फूटप्रिंटचे/पदचिन्ह मूल्यांकन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य/केंद्र शासित प्रदेश बनले आहे?

A) गोवा

B) दिल्ली

C) चंदीगड

D) पुद्दुचेरी

 

 

10) 'अल्टर्नेट एनर्जी लाईट ट्रॅप' हे खालील पैकी काय आहे?

A) सौर ऊर्जेचे नवीन उपकरण

B) सौर कीटक व्यवस्थापन यंत्र

C) पवन उर्जेवर आधारित कीटकनाशक फवारणी यंत्र

D) अणू उर्जेला पर्यायी तंत्रज्ञान

 

उत्तर आणि स्पष्टीकरणाची PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे

दिनांक ०४-०३-२०२१ चालू घडामोडी सराव चाचणी (QUIZ) उत्तर आणि स्पष्टीकरण PDF FILE DOWNLOAD




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, Please let me Know.

MPSC आणि परीक्षार्थींच्या व्यथा - एका विद्यार्थ्याचा संदेश

 का वाचू मी,, हे लिखाण???? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.. कारण की, लिखाण करणारा मी कोणी महान नाहीये.. खरतर,,एक स्पर्धा परिक्षा करणारा व्यक्...