पुस्तक परिचय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक परिचय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या काही पुस्तकांचा परिचय

 

२३ जानेवारी हा दिवस 'नेताजी सुभाषचंद्र बोस' यांची जयंती म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. २३ जानेवारी १८९७ त्यांचा जन्मदिवस. नेताजींचे विचार आणि त्यांची देशाबद्दलची दूरदृष्टी समजून घेण्यासाठी त्यांच्यावरील उपलब्ध पुस्तके अभ्यासणे अनिवार्य आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर अनेक पुस्तके आणि कादंबऱ्या लिहल्या गेल्या आहेत. खाली काही महत्वपूर्ण पुस्तकांबद्दल माहिती दिली आहे. सुरुवातीला नेताजींनी स्वतः लिहलेल्या पुस्तकांबद्दल माहिती आहे व नंतर इतर लेखकांच्या पुस्तकांबद्दल माहिती आहे.

१) The Indian Struggle

हे पुस्तक स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लिहले आहे. या पुस्तकात नेताजींनी १९२० पासून ते १९३४ च्या घडामोडी त्यांच्या शब्दात लिहल्या आहेत. स्वराज पार्टीची स्थापना आणि त्याचे उद्धेश, सी.आर.दास यांचे योगदान, गांधी-आयर्विन करार, गोलमेज परिषद, जातीय निवड या बद्दल नेताजींनी विस्ताराने लिहले आहे. नेताजींचा अनुभव आणि १९२० ते १९३४ दरम्यान घडलेल्या घडामोडींचे त्यांचे बारीक निरीक्षण हे या पुस्तकातून आपल्याला त्या काळातील हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करतात.

खालील लिंक वरून तुम्ही हे पुस्तक ऍमेझॉन वरून खरेदी करू शकता.


 https://amzn.to/2McZdgW

२) An Indian Pilgrim - An Unfinished Autobiography

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अप्रतिम आणि मूळ आवृत्तीमधील हे एक अपूर्ण आत्मकथन आहे. स्वतःच्या जन्मापासून ते भारतीय ब्रिटिश नागरी सेवेचा राजीनामा देईपर्यंतचे जीवनकथन त्यांनी स्वतः १९३७ च्या शेवटी शब्दबद्ध केले आहे. १९३७ नंतर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत नेतांजींनी खूप मोठा संघर्ष केला आणि हा संघर्ष त्यांना त्यांच्या शब्दात मांडण्यासाठी वेळ मिळाला नाही. म्हणूनच या पुस्तकाला 'एक अपूर्ण आत्मकथन' असे नाव देण्यात आले आहे.

या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी, कटकमधील चुलतभाऊ आणि नातेवाईकांबरोबर व्यतीत केलेला वेळ, विद्यार्थी दशेत घडलेले त्यांचे जीवन, कलकत्तामधील प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये प्रतिभावान विद्यार्थी म्हणून बौद्धिक विकास कसा झाला, त्यांचे अध्यात्मिक ज्ञान आणि प्रतिष्ठित केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थी म्हणून त्यांचे अनुभव हे सगळे वर्णन केले आहे. स्वतः नेताजींच्या शब्दात त्यांचे जीवन समजून घेणे हे एक अविस्मरणीय आणि स्वर्गीय आनंद असणार आहे.

हे पुस्तक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होणार आहे. तरीही तुम्ही या पुस्तकासाठी खालील लिंक वरून पूर्वनोंदणी करू शकता.

https://amzn.to/3p3s5H0

 

३) Azad Hind: Writings and Speeches 1941-1943

१६-१७ जानेवारी १९४१ रोजी रात्री सुभाषचंद्र बोस कलकत्त्यातील आपल्या राहत्या घरातून गुप्तपणे बाहेर पडले होते. ब्रिटिश सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले होते. त्यांचा पुतण्या सिसिरने या कामी नेताजींना मदत केली होती. पुतण्या सिसिरने नेताजींना तत्कालीन बिहारमधील 'गोमोह' रेल्वे जंक्शनला सोडले होते. सध्या गोमोह रेल्वे जंक्शनला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे आणि हे जंक्शन झारखंड मधील धनबाद जिल्ह्यात येते. नेताजी राहत्या घरातून गुप्तपणे बाहेर पडले तेव्हा त्यांनी ब्रिटिशांनी गुंगारा देण्यासाठी पुढील तारखेचे अनेक पत्र घरात लिहून ठेवले होते. पुतण्या सिसिर ठराविक कालावधीनंतर हे पत्र पोस्टात टाकत असे. ब्रिटिश गुप्तहेर ही पत्र वाचून पुढे पाठवीत असत. या पत्रांमुळे ब्रिटिशांना वाटत होते की नेताजी घरातच आहेत.

सदर पुस्तकात नेताजींचा १९४१ ते १९४३ मधील सर्व पत्रव्यहार तसेच त्यांची विविध भाषणे एकत्रित केली आहेत.

या पत्रव्यहारातून आणि भाषणातून आपल्याला अनेक विषयासंदर्भात नेताजींचे विचार कळतात तसेच अत्यंत महत्वपूर्ण तत्कालीन माहिती मिळते. दुसरे महायुद्ध,१९४२ ची क्रिप्स ऑफर नाकारण्याची कारणे, भारताच्या अंतर्गत आणि बाह्य धोरणामध्ये फरक करण्याची आवश्यकता, महात्मा गांधी आणि भारत छोडो आंदोलनास पाठिंबा, मुक्त भारताचे भविष्यातील पुनर्निर्माण आणि समस्यांवरील उपाय, विसाव्या शतकातील राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीय संबंध अशा अत्यंत महत्वपूर्ण विषयांवर नेताजींचे विचार आणि तत्कालीन परिस्थितीचा आढावा आपल्याला या पुस्तकातून कळेल.

खालील लिंक वरून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता.

https://amzn.to/3iyHA7z

 

४) India's Biggest Cover-Up


अनुज धर यांनी हे पुस्तक लिहले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दल अनेक गूढकथा निर्माण झाल्या आहेत. नेताजींच्या मृत्यबद्दल आपल्या देशात नेहमीच चर्चा केली जाते. सदर पुस्तकात लेखकाने अधिकृत सरकारी अभिलेखांचा अभ्यास करून माहिती सादर केली आहे. भारत सरकार, ब्रिटिश सरकार तसेच अमेरिकी सरकारच्या अधिकृत सरकारी अभिलेखांचा आधार यात घेण्यात आला आहे.

खालील लिंक वरून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता.

https://amzn.to/3o7Ps11

 

५) His Majesty's Opponent: Subhas Chandra Bose and India's Struggle Against Empire



प्राध्यापक सुगाता बोस यांनी हे पुस्तक लिहले आहे

प्राध्यापक सुगाता बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाचा अभ्यास केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जवळपास सर्व नातेवाईकांची मुलाखत लेखाने घेतली आहे. कोलकाता आणि केंब्रिजमधील नेताजींच्यावर असणाऱ्या बौद्धिक प्रभावाचा आढावा लेखकाने घेतला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनाचा आढावा या पुस्तकातून आपल्याला अभ्यासायला मिळेल.

खालील लिंक वरून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता.

https://amzn.to/3qLcWue

 

६) Brothers Against the Raj: A Biography of Indian Nationalists Sarat and Subhas Chandra Bose


लिओनार्ड ए.गॉर्डन यांनी हे पुस्तक लिहले आहे.

सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे भाऊ सरथ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी होते.

लिओनार्ड ए.गॉर्डन यांनी संग्रहातील अभिलेखांचा तसेच दोन्ही भावांच्या राजकीय समकालीन आणि कुटुंबातील सदस्यांचे १५० पेक्षा जास्त मुलाखती घेतल्या आहेत. तसेच शेकडो अप्रकाशित पात्रांचा अभ्यास केला आहे. सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे भाऊ सरथ यांचे जीवनचरित्र या पुस्तकातून वर्णन केले आहे.

खालील लिंक वरून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता.

https://amzn.to/2LKSuLv

 

७) BOSE An Indian Samurai : Netaji and the INA A Military Assessment


माजी मेजर जनरल जी.डी.बक्षी यांनी हे पुस्तक लिहले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे लष्करी नेते आणि भारताचे सर्वोच्च कमांडर म्हणून मूल्यमापन करण्याचा प्रयत्न

लेखकाने केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेताजींची 'इंडियन नॅशनल आर्मी' मधील भूमिका तसेच त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन या पुस्तकातून लेखकाने केले आहे.

खालील लिंक वरून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता.

https://amzn.to/3iz9OPo

 



८) Mahanayak (English)

विश्वास पाटील यांनी लिहलेली ही कादंबरी आहे.

विश्वास पाटील यांच्या उत्कृष्ट मराठी कादंबरीचे इंग्रजी अनुवाद आहे. १९९८ मध्ये पहिल्यांदा मराठीत प्रकाशित झालेल्या या कादंबरीने सातत्यपूर्ण बेस्टसेलर म्हणून स्थान टिकवले आहे तसेच जवळपास चौदा भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे.

खालील लिंक वरून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता.

https://amzn.to/2Y03182

 



९) महानायक (मराठी)

विश्वास पाटील यांनी लिहलेली ही कादंबरी आहे.

मराठी भाषेतील प्रसिद्ध कादंबऱ्यांमध्ये विश्वास पाटील लिखित 'महानायक' कादंबरीचे नाव घेणे अनिवार्य आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मापासून ते मृत्यपर्यंतचा अदभूत आणि आश्चर्यकारक प्रवास समजून घेण्यासाठी मराठी मधील ही एकमेव परिपूर्ण कादंबरी आहे. नेताजींचे देशप्रेम, त्यांची देशाच्या भविष्याबद्दल असणारी दूरदृष्टी, त्यांचा संघर्ष, त्यांचे मतभेद आणि त्यांची एकूण जडणघडण हे सर्व विश्वास पाटील यांच्या चुंबकीय शब्दात अभ्यासणे म्हणजे प्रत्यक्षात नेताजींना भेटल्यासारखे वाटते. मराठी भाषा वाचता येणाऱ्या प्रत्येकाने ही कादंबरी आयुष्यात एकदा तरी वाचली पाहिजे अशी आहे.

खालील लिंक वरून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता.

https://amzn.to/2KCAYIB

 

धन्यवाद

 

वरील माहिती जास्तीसजास्त अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही चूक असल्यास कळवावे.

धन्यवाद

 

Best Sellers in Books

MPSC आणि परीक्षार्थींच्या व्यथा - एका विद्यार्थ्याचा संदेश

 का वाचू मी,, हे लिखाण???? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.. कारण की, लिखाण करणारा मी कोणी महान नाहीये.. खरतर,,एक स्पर्धा परिक्षा करणारा व्यक्...