MPSC आणि परीक्षार्थींच्या व्यथा - एका विद्यार्थ्याचा संदेश



 का वाचू मी,, हे लिखाण???? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.. कारण की, लिखाण करणारा मी कोणी महान नाहीये.. खरतर,,एक स्पर्धा परिक्षा करणारा व्यक्तीच दुस-या स्पर्धा परिक्षा करणा-या व्यक्तीच्या व्यथा समजू शकतो....म्हणूनच आज माझ्या मना अंतरी चाललेली घालमेल रेखाटण्याचा प्रयत्न करतोय... गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने घातलेला थैमान त्यचबरोबरीने MPSC ने आणि राज्यसरकारने मांडलेला डाव,,,  परिणामी विद्यार्थ्यांच्या मनावर कुठेतरी खोलवर रूजतेला घाव..... या सगळ्यातूनच मनामध्ये वाढतेली नकारात्मकता, पसरतेल्या निराशा,, कित्येकांची भंगतेली स्वप्ने, वाढतेल्या वयाचा प्रश्न, जबाबदारीतून कुठवर पळ काढायचा हा विचार, विवाह बंधंनाचा प्रश्न, आर्थिक प्रश्न अशा एक ना अनेक प्रश्नांना सामोरे जात असलेल्या,, अखंड महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील MPSC चा अभ्यास करणा-या  माझ्या बंधु आणि भगीनी अधिका-यांनो...... 

आजची स्थीती अशी की,, परिक्षेच्या तारखा जाहीर झाल्या कि लगेचच निद्रावस्थेतल्या मार्केटमधील क्लासेसवाले, you tube चॅनेल वाले खाडंकन जागे होतातं आणि discount मध्ये उजळणी कोर्स, संपूर्ण रिव्हीजन कोर्स, फास्ट्रॅक बॅचेस माफक दरात 'केवळ आपल्यासाठी!!!  अशा तशा हजारो जाहीराती करून आपापल्या कच्च्या राहीलेल्या पोळ्या भाजून घ्येण्याच काम करतात...  खरतर परिक्षा दोन-तीन दिवसावर येवून ठेपलेली असते,,  आणि  अचानकपणे जेव्हा परिक्षा रद्द केली जाते,, तेव्हा त्या कष्टकरू विद्यर्थ्यांना कोण-कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते,, कोण-कोणत्या मानसिकतेला सामोरे जावे लागते.. ना-ना तरहच्या विचारांना सामोरे जावे लागते.. इथच खरी गरज असते कोणत्या ना कोणत्या आधाराची, पण दुर्दैव अस की अशा विषयावर लिहीणारा आणि बोलणारा (काही अपवाद वगळता) कोणीच का दिसत नाही....    

माझ्या बंधुंनो आणि भगीनींनो,, अप्पासाहेब खोतांच्या म्हणन्याप्रमाणे,

 "खर दुःख ज्याच त्याला ज्याच त्यान तोंडाला कुलूप लावून सोसायचं." बाकीचा सारा मायेचा बाजार आहे.... आपल्या वेळेची, आपल्या वर्तमानाची, आपल्या स्वप्नांची आणि आपल्या भवितव्यांची कोणालाचं परवा नाहीये शिवाय आपले घरचे.. बाकीच्या सर्वानी आपल्या भावनिकतेशी,, आपल्या मानसीकतेशी आपल्या वेळशी खेळी केली...

मित्रहो,, आपल्या सर्वांचे ठिकाण एकच आहे दिशाही एकच आहे,, साहजीकच मार्गही एकच..

याच मार्गातील तुम्ही आम्ही प्रवासी आहोत.. त्यामुळे या प्रवासातील आपले दुःख आपल्याचशिवाय जास्त दुसरा कोणी समजूच शकणार नाही... याच बिकट परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी,, मनातील मावळत चाललेली ज्योती अधिकाधीक प्रज्वलीत ठेवण्यासाठी आणि हा उर्वरीत मार्ग सर करण्यासाठी,,

जास्तीत जास्त मनाला अभ्यासातच व्यस्त ठेवू..  भले ही आज तुम्ही आम्ही एकमेकांसाठी काही करू ही शकत नसलो किंवा काही देवू ही शकत नसलो,, तरी कुसुमाग्रजांच्या कवीतेतील वाक्याची पुनरावृत्ती करून "पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा" अशी सहानुभूती एकमेकांना नक्कीच देवू शकतो.....

मित्रहो,, दोन-तीन-चार वर्षांच्या अफाट परिश्रमाने युद्धासाठी सज्ज झालेले आपण सर्वजन या MPSC च्या रणांगणातील योद्धे आहोत... पण सद्यस्थितीत रणांगणच रिकाम आहे.. आता तर खरी परिक्षा आपल्या अभ्यासाची नसून आपल्या  सय्यमाची आहे.. म्यनबंद शस्त्र मध्येच टाकून रणांगण सोडायचं की,, समोर शत्रू येईपर्यंत रणांगणात तग धरून रहायचं!!. इथून पूढे होणा-या परिक्षा या फक्त आपल्या अभ्यासाची पातळी चेक करणा-या नसून अभ्यासाबरोबरीने आपल्या मानसिकतेची ही पातळी चेक करणा-या असतील..  सो येणा-या प्रत्येक अडचणींना एक आव्हान समजून मनाच्या भावनीकतेचा आणि ओघळना-या अश्रूचा बांध अधीक मजबूत करून आपले इच्छित ध्येय गाठे पर्यंत......

न थांबता,,  न थकता,,,

मनातील जागृतीचा विस्तव असाच प्रज्वलीत ठेवूया...... 


आपला हितचिंतक,,,

आपला  सहप्रवासी.....

सिद्द-जिद्द

97651 52305

(कोल्हापूर)




MPSC आणि परीक्षार्थींच्या व्यथा - एका विद्यार्थ्याचा संदेश

 का वाचू मी,, हे लिखाण???? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.. कारण की, लिखाण करणारा मी कोणी महान नाहीये.. खरतर,,एक स्पर्धा परिक्षा करणारा व्यक्...