अनुक्रमणिका:
1) आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२१
2) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास
3) चर्चेतील अहवाल
4) आंतराराष्ट्रीय पातळीवर महिला सशक्तीकरणाचे प्रयत्न
5) भारतातील काही महत्वपूर्ण महिला चळवळी
6) भारतीय महिलांच्या ठळक समस्या
7) महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणासाठी असणारे काही महत्वपूर्ण कायदे
8) महिला सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण योजना
9) भारतीय महिलांचे योगदान - विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या पहिल्या महिला
आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२१
Ø दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला
दिनाचे आयोजन केले जाते.
Ø हा दिवस महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक कामगिरीचा उत्सव
म्हणून जगातील विविध क्षेत्रांमधील महिलांचा आदर दर्शविण्यासाठी साजरा केला जातो.
Ø महिलांना समाजात समान हक्क
मिळवण्यासाठी झालेल्या आणि होत असलेल्या संघर्षाला या दिवशी सलाम करण्यात येतो.
Ø आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२१ ची
संकल्पना - - “महिलांचे नेतृत्व : कोविड -१ च्या जगात
समान भविष्य प्राप्त करणे ".
Ø #ChooseToChallenge या हॅशटॅग द्वारे जागतिक स्तरावर
आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२१ साजरा केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास
Ø १९०८ साली न्यूयॉर्क शहरामध्ये १५ हजार
महिलांनी मोर्चा काढून ऑफिसचे तास कमी करण्याची मागणी केली होती.
Ø इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी एकत्र
येऊन स्वतःच्या हक्कासाठी केलेले हे पहिलेच मोठे आंदोलन होते. यावेळी या महिलांनी
वाढीव पगार तसेच मतदानाच्या हक्काचीही मागणी केली होती.
Ø १९०८ च्या न्यूयॉर्क शहरातील झालेल्या
महिलांच्या आंदोलनाच्या स्मरणार्थ अमेरिकेत २८ फेब्रुवारी, १९०९ रोजी पहिला राष्ट्रीय महिला दिन
साजरा करण्यात आला होता.
Ø १९१० मध्ये एक आंतरराष्ट्रीय महिला
परिषेद पार पडली. या परिषदेमध्ये ८ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्याचा ठराव
करण्यात आला.
Ø १९१३ पासून, ८ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात
येऊ लागला.
Ø १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले.
Ø डिसेंबर १९७७ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने
दरवर्षीचा ८ मार्च हा दिवस महिला हक्क आणि आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून एक
ठराव मंजूर केला.
Ø १९७७ पासून खऱ्या अर्थाने '८ मार्च' जागतिक पातळीवर महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
Ø १९७६-१९८५ - संयुक्त राष्ट्राकडून 'महिलांचे दशक' म्हणून साजरे केले गेले.
चर्चेतील अहवाल
'विमेन इन पार्लमेन्ट' (Women
In Parliament) अहवाल
Ø संयुक्त राष्ट्र संघटनेची सहकारी
संस्था असलेल्या Inter-Parliamentary Union (IPU) हा अहवाल बनवला आहे.
Ø या अहवालातील ठळक बाबी :
Ø आत्तापर्यंत महिलांनी केवळ २२
देशांमध्ये राज्य प्रमुख किंवा सरकार प्रमुख म्हणून काम केले आहे.
Ø केवळ २१ टक्के महिला सरकारी मंत्री
राहिल्या आहेत.
Ø केवळ १४ देशांमध्ये ५० टक्के किंवा
त्यापेक्षा जास्त महिला कॅबिनेटमध्ये राहिल्या आहेत.
Ø १९९५ साली सर्व देशांमध्ये मिळून ११
टक्के असणाऱ्या महिला खासदारांची संख्या सध्या २५ टक्के झाली आहे.
Ø फक्त चार देशांच्या संसदेत ५० टक्के
किंवा त्याहून अधिक महिला आहेत: रुवांडा ६१ टक्के, क्युबा ५३ टक्के, बोलिव्हिया ५३ टक्के आणि संयुक्त अरब
अमिराती ५० टक्के
आंतराराष्ट्रीय पातळीवर महिला
सशक्तीकरणाचे प्रयत्न
1) जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र (UNHDR)
Ø स्थापना : १९४८
Ø महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि
महिलांना सन्मान तसेच समानता प्राप्त करून देण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र बांधील
आहे.
2) महिलांसाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट फंड (United Nations Development Fund for Women)
Ø स्थापना : डिसेंबर १९७६
Ø संयुक्त राष्ट्र संघटनेने
आंतरराष्ट्रीय महिला दशक साजरा करण्यासाठी स्वयंसेवी निधी म्हणून या फंड ची स्थापना
केली होती.
3) CEDAW आंतरराष्ट्रीय करार
Ø स्थापना : १९७९
Ø महिलांविरूद्ध होणाऱ्या सर्व
प्रकारांच्या भेदभावाचे निर्मूलन करणे हा आंतरराष्ट्रीय करार (सीएडीएडब्ल्यू)
संयुक्त राष्ट्र महासभेने १९७९ मध्ये स्वीकारलेला आहे.
Ø महिलांच्या हक्कांचे आंतरराष्ट्रीय
विधेयक म्हणून वर्णन केलेल्या या कराराला १८९ देशांनी मान्यता दिली आहे.
4) मातृत्व संरक्षण करार
Ø स्थापना : २०००
Ø हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा करार
आहे.
Ø या करारात पुढील तरतुदींचा समावेश आहे
- आरोग्य संरक्षण, प्रसूती रजा (१४ आठवड्यापेक्षा जास्त),आजारपणी कामावर सुट्टी, रोजगार संरक्षण आणि रोजगारात भेदभाव न
करणे, आणि स्तनपान करणाऱ्या मातांना योग्य
सुविधा.
5) यूएन वूमेन (UN
WOMEN)
Ø स्थापना : जुलै २०१०
Ø कार्यास प्रारंभ : जानेवारी २०११
Ø मुख्यालय : न्यूयॉर्क
Ø संयुक्त राष्ट्र आमसभेने यूएन वूमेन, जेंडर इक्विलिटी फॉर युनायटेड नेशन्स
इन्टिटी आणि महिला सबलीकरण तयार केले.
Ø Division for the Advancement of Women
(DAW); International Research and Training Institute for the Advancement of
Women (INSTRAW), स्थापना: १९७६; Office of the Special Adviser on Gender Issues and Advancement of Women
(OSAGI), स्थापना: १९९७; United Nations Development Fund for Women (UNIFEM), स्थापना: १९७६
Ø वरील ४ विभांगांचे यूएन वूमेन मध्ये
विलीनीकरण करण्यात आले.
6) 'हिफॉरशी' चळवळ (HeForShe)
Ø संयुक्त राष्ट्र संघटनेने सुरू
केलेल्या लिंग समानतेच्या प्रगतीसाठी ही एक चळवळ आहे.
Ø २० सप्टेंबर २०१४ रोजी न्यूयॉर्क
शहरातील संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मुख्यालयातून ही चळवळ सुरु करण्यात आली.
Ø १९४३ च्या ८ मार्च रोजी भारतामध्ये
प्रथमच महिला दिवस मुंबई मध्ये साजरा करण्यात आला.
7) शाश्वत विकास ध्येये (एस.डी.जी.)
Ø स्थापना : २०१५
Ø कालावधी : २०१५ ते २०३०
Ø आंतरराष्ट्रीय विकास शाश्वत पद्धतीने
होण्यासाठी ही ध्येये ठरवली गेली आहेत.
Ø यात एकूण १७ ध्येये आहेत, त्यापैकी महिला सशक्तीकरणासाठी खालील
ध्येये आहेत
Ø ध्येय ५ - लिंग समानता
Ø ध्येय १० - असमानता कमी करणे
Ø ध्येय १७ - ध्येयांसाठी भागीदारी
भारतातील काही महत्वपूर्ण महिला चळवळी
1) चिपको चळवळ
Ø १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात
उत्तराखंड (तत्कालीन उत्तर प्रदेश) राज्यात चिपको आंदोलन सुरू झाले होते.
Ø गावातील महिलांनी घराबाहेर पडून
उद्योगपतींना झाडे तोडण्यासाठी प्रखर विरोध केला.
2) खाप पंचायतींविरूद्ध जगमती सांगवान यांची चळवळ
- १९९५
Ø जगमती सांगवान यांनी १९९५ मध्ये खाप
पंचायंतीच्या महिलांविरुद्ध अन्यायकारक निकालांना विरोध सुरु केला.
Ø त्यांना स्थापन केलेल्या जनवादी महिला
समितीत ५०,००० महिला सहभागी झाल्या आहेत.
3) मणिपूरच्या मातांचा नग्न निषेध - २००४
Ø मनोरमा या स्त्रीवरील सैन्याच्या
अत्याचाराच्या निषेधार्थ इम्फाळच्या रस्त्यावर महिलांनी नग्न होऊन निषेद व्यक्त केला होता.
4) आंध्र प्रदेशात दारूबंदी आंदोलन
Ø महिलांच्या नेतृत्त्वाच्या संघर्षामुळे
शेवटी १९९५ मध्ये दारूबंदीवर राज्यव्यापी बंदी आणली गेली.
5) गुलाबी गँग
Ø २००२ मध्ये उत्तर प्रदेशच्या बांदा
येथील सुमनसिंग चौहान यांनी ही चळवळ सुरु केली.
Ø महिलांवरील होत असलेल्या पुरुषी
हिंसेला प्रत्युत्तर देण्यासाठी यांनी ही महिलांची गुलाबी गँग बनवली.
भारतीय महिलांच्या ठळक समस्या
आपल्या
भारतात महिलांच्या समस्यांचे मूळ हे पुरुषप्रधान संस्कृती मध्ये आहे. पुरुषप्रधान
संस्कृती मुले महिलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. खूप कमी महिला
या स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.
महिलांच्या
काही ठळक समस्या
१)
स्त्रीभ्रुण हत्या - गर्भातच मुलींना मारले जात आहे. जन्मापासून
मृत्य पर्यंत भारतीय महिलांसमोर असंख्य समस्या उभ्या आहेत. दर हजार पुरुषांमागे
फक्त ९४० महिलांचे प्रमाण (२०११ जनगणना) भारतात आहे. ० ते ६ वयोगटातील लिंग
असमानता ९१४ (दर हजार मुलांमागे) इतकी भयावह आहे.
२)
शैक्षणिक समस्या -
अजूनही मुलींना मुक्तपणे शिक्षणासाठी पाठवले जात नाही. घरात शिक्षणासाठी मुलीच्या
आदी मुलाचा विचार केला जातो. चूल आणि मूल या मानसिकतेतून अजूनही आपला भारतीय समाज
बाहेर येऊ शकला नाही याचे हे उदाहरण आहे
३)
हुंडा प्रथा -
लग्न करताना आणि लग्न झाल्यावरही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात हुंडा देणे आणि घेणे
ही वाईट प्रथा आहे. हुंडा प्रथेमध्ये महिलांचे मानसिक आणि शारीरिक शोषण मोठ्या
प्रमाणात होते.
४)
कौटूबिंक हिंसाचार -
कौटुंबिक हिंसाचार कायदा असूनही दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला कौटुंबिक
हिंसाचाराच्या घटना दिसून येतात.
५)
सामाजिक हिंसाचार -
समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असल्याने, छेडाछेड, बलात्कार, विनयभंग, असिड हल्ला,
इतर समस्यांना महिलांना सामोरे जावे
लागत आहे.
६)
आरोग्य समस्या -
महिलांना कुटुंबात पौष्टिक भेदभावाचा सामना करावा लागतो आणि ते अशक्त आणि कुपोषित
असतात. भारतामध्ये जवळजवळ अर्ध्या किशोरवयीन मुली तीव्र कुपोषित आहेत.
७)
ऑनर किलिंग -
कुटूंबाची मर्जी न घेता मुलीने लग्न केले किंवा तिच्या जाती किंवा धर्माबाहेर लग्न
केल्यामुळे भारताच्या काही राज्यात विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा या राज्यांमध्येही ऑनर किलिंग
होते.
८)
बालविवाह -
युनिसेफच्या “स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन
-२००९" ”च्या अहवालानुसार, भारतातील ४७% महिलांचे लग्न १८ वयवर्षे
पूर्ण होण्यापूर्वी झालेले आहे. अहवालात असेही दिसून आले आहे की जगातील ४०%
बालविवाह भारतात होतात.
९)
कामाचा असमान मोबदला - २०१७ मध्ये मॉन्स्टर वेतन निर्देशांक (एमएसआय) च्या अभ्यासानुसार
भारतातील एकूण लिंग वेतन अंतर २० टक्के असल्याचे दिसून आले. म्हणजेच असंघटित
क्षेत्रात महिलांना सरासरी २० टक्के कमी वेतन मिळते.
१०)
महिलांची तस्करी -
तरुण मुली आणि महिलांच्या तस्करीची अनेक घटना समोर येत आहेत.
महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणासाठी
असणारे काही महत्वपूर्ण कायदे
ब्रिटिशांनी
महिलांसाठी केलेले काही महत्वपूर्ण कायदे
1) Bengal
Sati Regulation, 1829
2) Hindu
Widows' Remarriage Act, 1856
3) Female Infanticide
Prevention Act, 1870
4) Age of
Consent Act, 1891
5) Child Marriage
Restraint Act, 1929
स्वतंत्र
भारतातील महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणासाठी असणारे काही महत्वपूर्ण कायदे
1) Immoral Traffic (prevention) Act, 1956
2) Dowry Prohibition Act, 1961
3) Commission of Sati(Prevention) Act, 1987
4) Minimum Wages Act, 1948
5) Prevention of Children from Sexual Offences Act, 2012
6) Indecent Representation of Women(Prevention) Act,1986
7) Special Marriage Act, 1954
8) Hindu Successions Act, 1956
9) Foreign Marriage Act, 1969
10) Maternity Benefit Act, 1961
11) Hindu Adoption & Maintenance Act, 1956
12) Medical Termination of Pregnancy Act, 1971
13) National Commission for Women Act, 1990
14) The Pre-conception and Pre-natal Diagnostic Techniques (Prohibition
of Sex Selection) Act, 1994
15) Protection of Women from Domestic Violence Act, 2005
16) Sexual Harassment of Women at Work Place (Prevention, Prohibition
& Redressal) Act, 2013
17) Indian Divorce Act, 1969
18) Equal Remuneration Act, 1976
महिला सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या
महत्वपूर्ण योजना
1) बेटी
बचाओ बेटी पढाओ योजना
2) वन
स्टॉप सेन्टर योजना
3) महिला
हेल्पलाईन योजना
4) उज्ज्वला
योजना
5) कार्यरत
महिला वसतिगृह
6) स्वाधार
गृह योजना
7) नारी शक्ती पुरस्कार
8) राज्य
महिला सम्मान आणि ज़िल्हा महिला सम्मान योजना
9) निर्भया
निधी
10) महिला
पोलीस स्वयंसेवक
11) महिला
शक्ती केंद्र
12) अंगणवाडी
सेवा योजना
13) प्रधानमंत्री
मातृ वंदना योजना
14) नॅशनल
क्रेच योजना (पाळणाघर योजना)
15) पोषण
अभियान
16) किशोरवयीन
मुलींसाठी योजना
महिला
सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण २००१ PDF
भारतीय महिलांचे योगदान - विविध
क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या पहिल्या महिला
Ø १८४८ - सावित्रीबाई फुले यांनी पती
ज्योतिराव फुले यांच्यासमवेत पुण्यातील मुलींसाठी शाळा सुरू केली. सावित्रीबाई
फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या.
Ø १८७९ - जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथून
यांनी १८४९ मध्ये बेथून शाळा स्थापन केली,जे
१८७९ मध्ये बेथून महाविद्यालयात विकसित झाले आणि त्यामुळे हे भारतातील पहिले महिला
महाविद्यालय बनले.
Ø १८८३ - चंद्रमुखी बसू आणि कदंबिनी
गांगुली भारतातील पहिल्या महिला पदवीधारक ठरल्या.
Ø १८८६ - कदंबिनी गांगुली आणि आनंदी
गोपाळ जोशी पाश्चात्य औषधशास्त्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील पहिल्या महिला
ठरल्या.
Ø १९०५ - सुझान आरडी टाटा कार चालविणारी
पहिली भारतीय महिला ठरली.
Ø १९१६ - समाज सुधारक धोंडो केशव कर्वे
यांनी महिलांसाठी पहिले विद्यापीठ सुरु केले. एसएनडीटी महिला विद्यापीठ असे त्याचे
सध्याचे नाव आहे.
Ø १९१७ - ऍनी बेसेंट भारतीय राष्ट्रीय
कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या.
Ø १९१९ - पंडिता रमाबाई त्यांच्या
प्रतिष्ठित समाज सेवेसाठी 'कैसर-ए-हिंद' पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला
ठरली.
Ø १९२५ - सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय
कॉंग्रेसच्या भारतात जन्मलेल्या प्रथम महिला अध्यक्षा झाल्या.
Ø १९३६ - सरला ठाकराल विमान उड्डाण
करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
Ø १९४४ - असीमा चॅटर्जी ही भारतीय
विद्यापीठाने डॉक्टरेट ऑफ सायन्स प्रदान केलेली पहिली भारतीय महिला ठरली.
Ø १९४७ - १५ ऑगस्ट १९४७ रोजी
स्वातंत्र्यानंतर सरोजिनी नायडू संयुक्त प्रांताच्या राज्यपाल झाल्या, त्या
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या. याच दिवशी अमृत कौर यांनी
देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्रीपदाची
सूत्रे स्वीकारली.
Ø १९५० - स्वातंत्र्योत्तर नंतरः
राज्यसभेच्या सदस्यासाठी नामांकित झालेल्या रुक्मिणी देवी अरुंडेल पहिल्या महिला
आहेत.
Ø १९५१ - डेक्कन एअरवेजच्या प्रेम माथूर
या प्रथम भारतीय महिला व्यावसायिक पायलट बनल्या.
Ø १९५३ - विजया लक्ष्मी पंडित संयुक्त
राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला (आणि प्रथम भारतीय) अध्यक्षा झाल्या
Ø १९५९ - अण्णा चंडी उच्च न्यायालयातील
(केरळ उच्च न्यायालय) प्रथम भारतीय महिला न्यायाधीश ठरल्या.
Ø १९६३ - सुचेता कृपलानी उत्तर
प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ठरल्या.
Ø १९६६ - कॅप्टन दुर्गा बॅनर्जी इंडियन
एअरलाईन्सच्या पहिली भारतीय महिला पायलट ठरली.
Ø १९६६ - कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी
समुदाय नेतृत्वासाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या
त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.
Ø १९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या
महिला पंतप्रधान झाल्या
Ø १९७० - कमलजित संधू आशियाई स्पर्धेत
सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
Ø १९७२ - किरण बेदी भारतीय पोलिस सेवेत (IPS) रुजू झालेल्या पहिल्या महिला भरती झाल्या.
Ø १९७९ - मदर टेरेसा यांनी नोबेल शांतता
पुरस्कार जिंकला, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला नागरिक.
Ø १९८४ - एव्हरेस्टवर चढाई करणारी
बाचेंद्री पाल पहिली भारतीय महिला ठरली.
Ø १९८६ - सुरेखा यादव पहिली आशियाई तसेच
भारतीय महिला लोको-पायलट/ रेल्वे चालक बनली.
Ø १९८९ - न्यायमूर्ती एम. फातिमा बीवी
भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या.
Ø १९९२ - माझागॉन डॉक शिपबिल्डर्स
लिमिटेडमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची कमांडंट म्हणून नियुक्त झाल्यानंतर
आशा सिन्हा भारताच्या निमलष्करी दलात पहिल्या महिला कमांडंट झाल्या.
Ø १९९२ - प्रिया झिंगन भारतीय सैन्यात भरती झालेल्या
पहिल्या महिला कॅडेट झाल्या.
Ø १९९९ - सोनिया गांधी विरोधी पक्ष नेते
पदावर असणाऱ्या पहिल्या महिला नेत्या झाल्या.
Ø २००० - ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली
भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी, वेटलिफ्टिंग स्पर्धेत 69 किलो वजनी गटात सिडनी ऑलिम्पिकमध्ये
कांस्यपदक.
Ø २००७ - प्रतिभा पाटील भारताच्या
पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या.
Ø २००९ - मीरा कुमार लोकसभेच्या पहिल्या
महिला सभापती झाल्या.
Ø २०११ - प्रियांका एन प्रथम भारतीय
मेट्रो पायलट बनली. बेंगलोर नामा मेट्रो चालक.
Ø २०११ - मिताली मधुमिताने शौर्यासाठी
सेना पदक जिंकणारी पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला.
Ø २०१४ - भाजप प्रणित केंद्र सरकार मध्ये
प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात मंत्रिमंडळात ७ महिलांना स्थान दिले गेले. ६
कॅबिनेट दर्जा असणाऱ्या महिला मंत्री आहेत.
Ø २०१९ - जे. जयललिता विधानसभेची निवडणूक
जिंकून सलग २ वेळा राज्यात राज्य करणार्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
ठरल्या.
Ø २०१७ - तनुश्री पारीक सीमा सुरक्षा
दलामध्ये (BSF) पहिल्या
महिला लढाऊ अधिकारी बनल्या.
Ø २०१८ - १९८० बॅचच्या IPS अर्चना रामसुंदरम डीजी, शशस्त्र सीमा बाल, अर्धसैनिक दलाच्या पोलिस महासंचालक
म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या आहेत.
Ø २०१८ - भारतीय हवाई दलाची २४ वर्षांची
फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी एकट्याने उड्डाण करणारी पहिली भारतीय महिला फाइटर
पायलट ठरली.
Ø २०१९ - उप-लेफ्टनंट शिवांगी भारतीय
नौदलातील प्रथम महिला पायलट बनली.
धन्यवाद
Amazon Bestsellers in Jewellery Buy Here
Amazon Bestsellers in BOOKS Buy Here
Amazon Bestsellers in Bags, Wallets and Luggage Buy Here
Amazon Bestsellers in Beauty Products Buy Here
Amazon Bestsellers in Mobiles & Tablets & Mobile Accessories Buy Here
Amazon Bestsellers in Sports, Fitness & Outdoors Buy Here
Amazon Bestsellers in Watches Buy Here
Amazon Bestsellers in Health Care Buy Here
Amazon Bestsellers in Shoes & Handbags Buy Here
Amazon Bestsellers in Clothing & Accessories Buy Here
Amazon Bestsellers in Computers & Accessories Buy Here