विविध स्पर्धा परीक्षा माहिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विविध स्पर्धा परीक्षा माहिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

UPSC CIVIL SERVICES EXAMINATION,2021 NOTIFICATION

 



CIVIL SERVICES EXAMINATION,2021

LAST DATE FOR SUBMISSION OF APPLICATIONS : 24.03.2021

HOW TO APPLY

Candidates are required to apply Online only by using the website

http://www.upsconline.nic.in.

LAST DATE OF SUBMISSION OF APPLICATIONS:

The Online Applications can be filled up to 24th March, 2021 till till 6:00 PM.

AGE LIMITS :

(a) A candidate must have attained the age of 21 years and must not have attained the age of 32 years on 1st August, 2021, i.e. he must have been born not earlier than 2nd August, 1989 and not later than 1st August, 2000.

(b) The upper age limit prescribed above will be relaxable:-

(i) upto a maximum of five years if a candidate belongs to a Scheduled Caste or a Scheduled Tribe.

(ii) upto a maximum of three years in the case of candidates belonging to Other Backward Classes who are eligible to avail of reservation applicable to such candidates.

MINIMUM EDUCATIONAL QUALIFICATIONS:

A candidate must hold a degree

NUMBER OF ATTEMPTS :

General Category Candidates : Six attempts

Other Backward Classes Candidates : Nine attempts

Scheduled Caste and Scheduled Tribe Candidates : Number of attempts will not apply

Preliminary Examination of the Civil Services Examination for recruitment to the Services and Posts mentioned below will be held by the Union Public Service Commission on 27th June, 2021

(i) Indian Administrative Service

(ii) Indian Foreign Service

(iii) Indian Police Service

(iv) Indian Audit and Accounts Service, Group ‘A’

(v) Indian Civil Accounts Service, Group ‘A’

(vi) Indian Corporate Law Service, Group ‘A’

(vii) Indian Defence Accounts Service, Group ‘A’

(viii) Indian Defence Estates Service, Group ‘A’

(ix) Indian Information Service, Junior Grade Group ‘A’

(x) Indian Postal Service, Group ‘A’

(xi) Indian P&T Accounts and Finance Service, Group ‘A’

(xii) Indian Railway Protection Force Service, Group ‘A’

(xiii) Indian Revenue Service (Customs & Indirect Taxes) Group ‘A’

(xiv) Indian Revenue Service (Income Tax) Group ‘A’

(xv) Indian Trade Service, Group ‘A’ (Grade III)

(xvi) Armed Forces Headquarters Civil Service, Group ‘B’ (Section Officer’s Grade)

(xvii) Delhi, Andaman and Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Civil Service (DANICS), Group ‘B’

(xviii) Delhi, Andaman and Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Police Service (DANIPS), Group ‘B’

(xix) Pondicherry Civil Service (PONDICS), Group ‘B’

TOTAL VACANCIES - 712

EXAM DATE - 27th June, 2021

FEE

Candidates applying (excepting Female/SC/ST/PwBD candidates who are exempted from payment of fee) for Civil Services (Preliminary) Examination are required to pay a fee of Rs.100/- (Rupees One Hundred only) either by depositing the money in any Branch of SBI by cash, or by using net banking facility of State Bank of India or by using Visa/Master/RuPay Credit/Debit card.


To download detail notification, please visit link given below:

UPSC CIVIL SERVICES EXAMINATION,2021 NOTIFICATION PDF


Bestsellers Books for UPSC Civil Services Prelims Examination


Bestsellers Books for UPSC Civil Services Mains Examination


THANK YOU




UPSC INDIAN FOREST SERVICES (IFoS) EXAMINATION 2021 NOTIFICATION

 



INDIAN FOREST SERVICE EXAMINATION, 2021

LAST DATE FOR SUBMISSION OF APPLICATIONS : 24.03.2021

HOW TO APPLY

Candidates are required to apply Online only by using the website

http://www.upsconline.nic.in.

LAST DATE OF SUBMISSION OF APPLICATIONS:

The Online Applications can be filled up to 24th March, 2021 till 18.00 Hours.

AGE LIMITS :

(a) A candidate must have attained the age of 21 years and must not have attained the age of 32 years on 1st August, 2021, i.e. he must have been born not earlier than 2nd August, 1989 and not later than 1st August, 2000.

(b) The upper age limit prescribed above will be relaxable:-

(i) upto a maximum of five years if a candidate belongs to a Scheduled Caste or a Scheduled Tribe.

(ii) upto a maximum of three years in the case of candidates belonging to Other Backward Classes who are eligible to avail of reservation applicable to such candidates.

MINIMUM EDUCATIONAL QUALIFICATIONS:

A candidate must hold a Bachelor's degree with at least one of the subjects namely Animal Husbandry & Veterinary Science, Botany, Chemistry, Geology, Mathematics, Physics, Statistics and Zoology or a Bachelor's degree in Agriculture, Forestry or in Engineering

NUMBER OF ATTEMPTS :

General Category Candidates : Six attempts

Other Backward Classes Candidates : Nine attempts

Scheduled Caste and Scheduled Tribe Candidates : Number of attempts will not apply

TOTAL VACANCIES - 110

EXAM DATE - 27th June, 2021

FEE

Candidates applying (excepting Female/SC/ST/PwBD candidates who are exempted from payment of fee) for Civil Services (Preliminary) Examination are required to pay a fee of Rs.100/- (Rupees One Hundred only) either by depositing the money in any Branch of SBI by cash, or by using net banking facility of State Bank of India or by using Visa/Master/RuPay Credit/Debit card.


To download detail notification please visit link given below

UPSC INDIAN FOREST SERVICES (IFoS) EXAMINATION 2021 NOTIFICATION PDF


Bestsellers Books for UPSC Civil Services Prelims Examination


Bestsellers Books for UPSC Civil Services Mains Examination


THANK YOU







'स्पर्धा परीक्षा' विश्व समजून घेताना...

                                    'करिअर' हा शब्द युवक-युवतींमध्ये अतिमहत्वपूर्ण आहे. भारतात 'करिअर' निवडताना 'शासकीय' नोकरीला प्राधान्य देणारे करोडो युवक-युवती आहेत. जवळपास सगळ्या शासकीय नोकऱ्यांसाठी 'स्पर्धा परीक्षा' देणे अनिवार्य आहे. आज इंटरनेट आणि मोबाईल मुळे माहितीचे स्रोत आपल्या बोटाच्या एका 'क्लिक' वर उपलब्ध आहेत. तरीही योग्य वेळी योग्य माहिती न मिळाल्यामुळे शैक्षणिक पात्रता असूनही अनेक युवक-युवतींना खूप साऱ्या परीक्षा देता येत नाहीत किंवा चुकीच्या माहितीमुळे 'करिअर'चे नुकसान होण्याची भीती असते. आपल्या भारतात दरवर्षी लाखो जागांसाठी शासकीय पदभरती होत असते आणि करोडो युवक-युवती यासाठी मेहनत घेत असतात. शासकीय पदभरती कोणत्या संस्थेकडून घेतली जाते? आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते? याचा संक्षिप्त आढावा खालील लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय पदभरती घेणाऱ्या संस्थेकडून कोणकोणत्या पदांसाठी कोणकोणत्या परीक्षा घेतल्या जातात याचे वर्गीकरण केल्यामुळे आपल्याला 'स्पर्धा परीक्षा' विश्व समजण्यास सोपे होईल अशी अपेक्षा.



परीक्षेला लागणाऱ्या संदर्भ पुस्तकांची लिंक प्रत्येक परीक्षेखाली दिलेली आहे.

UNION PUBLIC SERVICE COMMISSION – UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच 'युपीएससी' बद्दल दोन गैरसमज काहींना असतात. पहिला असा की 'युपीएससी' ही एक "परीक्षा" आहे आणि दुसरा असा की 'युपीएससी' दिल्याने हमखास 'कलेक्टर' होता येते. प्रथमतः दोन्ही गैरसमज इथे दूर करूया. युपीएससी ही ‘परीक्षा’ नसून ‘आयोग’ आहे, ज्याची तरतूद भारतीय राज्यघटनेत आहे. केंद्र शासनातील गट-अ सेवेच्या पदांसाठी विविध परीक्षा आयोजित करून उमेदवारांची निवड करून केंद्र सरकारला सुचविणे हे आयोगाचे कार्य आहे. म्हणजेच आयोग फक्त ‘कलेक्टर’ पदासाठी परीक्षा घेत नाही तर आणखी खूप साऱ्या पदांसाठी परीक्षा घेते. केंद्रीय लोकसेवा आयोग खालील विविध परीक्षा आयोजित करते.

1. CIVIL SERVICES EXAMINATION – CSE (नागरी सेवा परीक्षा)

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी सर्वात मोठी आणि महत्वाची परीक्षा. भारतातील सर्वात महत्वाची समजली जाणारी परीक्षा. या परीक्षेद्वारे ‘भारतीय प्रशासकीय सेवेसाठी’ (भा.प्र.से) निवड केली जाते. भाप्रसे अधिकारी जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून काम पाहतो. तसेच जिल्हा परिषद 'मुख्य कार्यकारी अधिकारी' आणि महानगरपालिका 'आयुक्त" सुद्धा याच भाप्रसे मधील निवड झालेले अधिकारी असतात. या परीक्षेद्वारे एकूण २४ विविध पदे भरली जातात भाप्रसे बरोबर भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा या इतर असे एकूण २४ विविध पदे या परीक्षेमध्ये समाविष्ट असतात. उमेदवारांना निवड झालेल्या यादीतीतील क्रमांकानुसार वरील २४ पदापैकी कोणतेही पद मिळू शकते. नागरी सेवा परीक्षेला "मदर ऑफ ऑल कॉम्पिटिटिव्ह एगजाम इन इंडिया" असे म्हंटले जाते या परीक्षेतून निवड होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात कोणत्याही राज्यात सेवा द्यावी लागते. भारतीय परराष्ट्र सेवेसाठी तर भारताबाहेर ही अनेक देशात सेवा द्यावी लागते कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षी शिकत असलेला उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

युपीएससी  नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि वन सेवेसाठी लागणाऱ्या संदर्भ पुस्तकांची यादी लेख संपल्यानंतर सविस्तरपणे दिलेली आहे. 

2. INDIAN FOREST SERVICE EXAMINATION – IFoS

आपल्या देशात एकूण तीन अखिल भारतीय सेवा आहेत.

१. भारतीय प्रशासकीय सेवा (भा.प्र.से)

२. भारतीय पोलीस सेवा (भा.पो.से) आणि

३. भारतीय वन सेवा (भा.व.से)

भाप्रसे व भापोसे ही पदे नागरी सेवा परीक्षेद्वारे भरली जातात, परंतु भारतीय वन सेवेसाठी वेगळी परीक्षा आयोजित केली जाते. भारतीय वन सेवेची पूर्व परीक्षा व नागरी सेवा पूर्व परीक्षा ही संयुक्त असते, परंतु भारतीय वन सेवेसाठी मेरिट वेगळे लावण्यात येते, भारतीय वन सेवेची मुख्य परीक्षा पूर्णतः वेगळी आयोजित केली जाते. देशभरातील वन व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण करण्याची जबाबदारी भा.व.से वर असते. या परीक्षेसाठी फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षी शिकत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

युपीएससी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि वन सेवेसाठी लागणाऱ्या संदर्भ पुस्तकांची यादी लेख संपल्यानंतर सविस्तरपणे दिलेली आहे. 

3. CENTRAL ARMED POLICE FORCES EXAMINATION – CAPF

या परीक्षेद्वारे केंद्रीय लोकसेवा आयॊग (युपीएससी) ' असिस्टंट कमांडंट' या पदासाठी उमेदवारांची निवड करते, असिस्टंट कमांडंट पद खालील ५ केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये (CAPF) कार्यरत आहे

अ. सीमा सुरक्षा दल (BORDER SECURITY FORCE – BSF)

ब. केंद्रीय राखीव पोलीस दल – (CENTRAL RESERVE POLICE FORCE – CRPF)

क. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल – (CENTRAL INDUSTRIAL SECURITY FORCE – CISF)

ड. इंडो - तिबेटियन सीमा पोलीस दल – (INDO-TIBETIAN BORDER POLICE – ITBF)

इ. सशस्त्र सीमा बल – (SASHASTRA SEEMA BAL – SSB)

सीमा सुरक्षा दल भारत-पाकिस्तान सीमेवरती कार्यरत आहे, केंद्रीय राखीव पोलीस दल देशभरात विविध ठिकाणी आणि विशेषतः नक्षली प्रभावित भागामध्ये कार्यरत आहे. केंद्रसरकार मालकीच्या मोठ्या उद्योगांचे, विमानतळाचे तसेच देशातील अति महत्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलावर आहे. तिबेटला लागून असणाऱ्या भारत चीन सीमेवर इंडो-तिबेटियन सीमा पोलीस दल कार्यरत आहे. ईशान्य भारतातील चीन तसेच बांग्लादेशच्या सीमेवर सशस्त्र सीमा बल आपली जबाबदारी पार पडत आहे. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षी शिकत असलेला उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/3gHaSje

4. COMBINED DEFENCE SERVICE EXAMINATION – CDSE

तिन्ही संरक्षण दलासाठी लेफ्टनंट या पदासाठी ही परीक्षा घेतली जाते, यासाठी लेखी परीक्षेचे आयॊजन केंद्रीय लोकसेवा आयॊग (युपीएससी) करते तसेच मुलाखतीचा भाग संबंधीत संरक्षण दल आयोजित करते. तिन्ही संरक्षण देशभरात कोठेही सेवा करावी लागते. विज्ञान शाखेतील पदवीला गणित आणि भौतिकशास्त्र विषय असलेल्या विध्यार्त्यांना नौदल आणि वायूदलासाठी अर्ज करता येते. इतर सर्व पदवीदारांना भूदलासाठी अर्ज करता येते. पदवीच्या शेवटच्या वर्षी शिकत असलेला उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो. वर्षातून दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोग ही परीक्षा आयोजित करते.

https://amzn.to/2W8gbyJ

5. NATIONAL DEFENCE ACADEMY – NAVAL ACADEMY EXAMINATION – (NDA –NA)

तिन्ही संरक्षण दलासाठी लेफ्टनंट या पदासाठी ही परीक्षा घेतली जाते, यासाठी लेखी परीक्षेचे आयॊजन केंद्रीय लोकसेवा आयॊग (युपीएससी) करते तसेच मुलाखतीचा भाग संबंधीत संरक्षण दल आयोजित करते. तिन्ही संरक्षण देशभरात कोठेही सेवा करावी लागते. फक्त या परीक्षेद्वारेच निवड झालेले उमेदवार पदोन्नती नुसार तिन्हीं संरक्षण दलाच्या प्रमुख पदापर्यंत पोहचतात. बारावीला शिकत असलेले व बारावी उत्तीर्ण उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. वर्षातून दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोग ही परीक्षा आयोजित करते.

https://amzn.to/37bZoBj

6. COMBINED GEO-SCIENTIST EXAMINATION

खाण मंत्रालय तसेच जल संसाधन मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विविध शास्त्रज्ञ पदांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. खाण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि जल संसाधन मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय भूजल बोर्डच्या देशभरातील विविध शहरांमध्ये असणाऱ्या कार्यालयांमध्ये कार्य करावे लागते. भूविज्ञान, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त असणारे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3nbYN8k

7. INDIAN ECONOMIC SERVICE/INDIAN STATISTICAL SERVICE EXAMINATION

भारतीय वित्तीय सेवा आणि भारतीय सांख्यिकीय सेवा या दोन वेगळ्या सेवा आहेत, परंतु यांची परीक्षेची जाहीरात एकत्र प्रसिद्ध केली जाते. तसेच दोन्ही सेवांसाठी शक्यतो एकाच दिवशी परीक्षा आयोजित केली जाते. भारतीय वित्तीय सेवेसाठी चार पेपर अर्थशास्त्र विषयाचे असतात तर भारतीय सांख्यिकीय सेवेसाठी चार पेपर सांख्यिकी विषयाचे असतात. वित्तीय मंत्रालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालय तसेच नीती आयोग आणि इतर मंत्रालयातील वित्तीय/सांख्यिकी विभागांमध्ये या सेवेत निवड झालेल्या उमेदवारास सेवा करावी लागते. भारतीय वित्तीय सेवेसाठी अर्थशास्त्र आणि संबंधित विषयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. तर भारतीय सांख्यिकीय सेवेसाठी सांख्यिकी आणि संबंधित विषयातून पदवी प्राप्त असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3oPQwHz

8. ENGINEERING SERVICES EXAMINATION

केंद्र सरकारच्या रेल्वे, बांधकाम, तसेच इतर मंत्रालयांतर्गत विविध शाखांच्या अभियंतांची तांत्रिक बाबींसाठी गरज असते. केंद्र शासनामध्ये वरिष्ठ अधिकारी पातळीवर तांत्रिक बाबींसाठी अभियंतांची निवड या परीक्षेद्वारे होते. भारतीय संरक्षण सेवेसाठी, रस्ते विकास मंत्रालय, केंद्रीय जल अभियांत्रिकी सेवेसाठी तसेच अलीकडे नवीन पद निर्माण केलेल्या भारतीय कौशल्य विकास सेवेसाठी सुद्धा अभियांत्रिकी पदवी असणाऱ्या उमेदवाराची निवड यु.पी.एस.सी या परीक्षेद्वारे करते.

https://amzn.to/2KitWIu

9. COMBINED MEDICAL SERVICES EXAMINATION

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय आरोग्य सेवेसाठी ही परीक्षा यु.पी.एस.सी  आयोजित करत असते. रेल्वे विभागाच्या रुग्णालयात, दारुगोळा निर्मिती विभागाच्या रुग्णालयात तसेच दिल्ली महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवड या परीक्षेद्वारे केली जाते. एम.बी.बी.एस पदवी प्राप्त उमेदवार या परीक्षेला अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3a33Xj0

‘युपीएससी’ चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट म्हणजे परीक्षांचे सुनियोजित वार्षिक वेळापत्रक. आपल्या देशातील इतर स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या सरकारी संस्था किंवा आयोग वेळापत्रक देत नाहीत आणि दिले तर परीक्षा वेळापत्रकानुसार होईल याची खात्री देत नाहीत. ‘युपीएससी’ यासाठी अपवाद आहे. ‘युपीएससी’ सहा महीने आधी पुढील एक वर्षाचे सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करते. वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यां'ना नियोजितपणे अभ्यास करता येते.

अधिकृत संकेतस्थळ – www.upsc.gov.in

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION -MPSC)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यपातळीवरील राज्य शासनाची गट अ, गट ब आणि गट क पदांसाठी परीक्षा घेण्याचे कार्य राज्य लोकसेवा आयोग करतात. केंद्र लोकसेवा आयोगानुसार राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद मूळ राज्यघटनेत आहे. महाराष्ट्रासाठी एमपीएससी. आहे. जसे युपीएससी ही 'परीक्षा' नसून 'आयोग' आहे, तसेच एमपीएससी ही परीक्षा नसून 'आयोग' आहे. एमपीएससी खालील विविध परीक्षा घेते.

1. राज्य सेवा परीक्षा (STATE SERVICES EXAMINATION)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी सर्वात मोठी आणि महत्वाची परीक्षा. साहजिकच महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्वाची परीक्षा म्हणणे वावगे ठरणार नाही. युपीएससी च्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार ही परीक्षा सुद्धा देत असतात. केंद्रीय नागरी सेवा परीक्षेतून ‘जिल्हाधिकारी’ होता येत असले तर 'एमपीएससी' च्या राज्यसेवा परीक्षेतून ‘उप जिल्हाधिकारीं’ होता येते. राज्य शासनाच्या सेवेतील राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, सहायक राज्यकर आयुक्त, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, तहसिलदार अशी जवळपास २८ पदांसाठी ही सामायिक परीक्षा 'एमपीएससी' प्रत्येक वर्षी आयोजित करत असते. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षी शिकत असलेला उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो. काही ठराविक पदांसाठी मात्र विशेष विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.

https://amzn.to/346HFco

2. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा (JMFC)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या न्यायिक सेवेतील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग संवर्गातील पदे या परीक्षेमधून भरले जातात. कायदेविषयक ज्ञान या परीक्षेतून तपासले जाते. विधी शाखेतील पदवी अभ्यासक्रमाचे प्रत्येक वर्ष प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण करून प्राप्त केली असली पाहिजे आणि विधी पदवीच्या अंतिम वर्षास किमान ५५ % गुण पहिल्या प्रयत्नात प्राप्त असणारे उमेदवार या परीक्षेला अर्ज करू शकतात. विधी मधील पदव्युत्तर पदवी किमान ५५ % इतक्या गुणांनी उत्तीर्ण असणारे उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3gO753S

3. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा (MAHARSHTRA SUBORDINATE SERVICES GRADE B)

पोलीस उप निरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या तीन अराजपत्रित (गट-ब) पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही परीक्षा आयोजित करते. या तिन्ही पदांसाठी एक सामायिक पूर्व परीक्षा घेतली जाते. पूर्व परीक्षेनंतर तिन्ही पदांसाठी वेगळी मुख्य परीक्षा आयोजित केली जाते. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षी शिकत असलेला उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/2KiRc9g

4. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा (MFS)

महाराष्ट्र शासनाच्या वनसेवेतील राजपत्रित गट-अ आणि गट-ब पदे या परीक्षेतून भरली जातात. सहायक वनसंरक्षक (गट-अ) व वनक्षेत्रपाल (गट-ब) ही दोन अधिकारी पदांसाठी एम.पीएस.सी. ही परीक्षा आयोजित करते. विज्ञान, कृषी आणि अभियांत्रिकी विद्याशाखेचा पदवीधर तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षी शिकत असलेला उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/380UZ3l

5. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त परीक्षा (MES)

राज्य शासनातील जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग तसेच मृद आणि जलसंधारण विभाग या सर्व विभागांसाठी गट-अ आणि गट-ब सेवेतील विविध शाखेतील अभियंत्यांची पदे या परीक्षेतून भरली जातात. या परीक्षेसाठी फक्त अभियांत्रिकी पदवी असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3meBMQA

6. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा (MAHARSHTRA GROUP ‘C’ SERVICES)

कर सहायक,दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) आणि लिपिक-टंकलेखक या तीन अराजपत्रित (गट-क) पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही परीक्षा आयोजित करते. या तिन्ही पदांसाठी एक सामायिक पूर्व परीक्षा घेतली जाते. पूर्व परीक्षेनंतर तिन्ही पदांसाठी वेगळी मुख्य परीक्षा आयोजित केली जाते. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षी शिकत असलेला उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/3qTh3p1

7. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (MAHARASHTRA AGRICULTURE SERVICES)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र कृषी सेवेतील पदे या परीक्षेतून भरली जातात. कृषी अधिकारी (गट-अ), कृषी अधिकारी (गट-ब) आणि कृषी अधिकारी (गट-ब) कनिष्ठ ही तीन पदे या परिक्षेअंतर्गत येतात. कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या, बी.एस्सी (कृषी) , बी.टेक (कृषी अभियांत्रिकी) या विषयातील पदवीधर तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षी शिकत असलेला उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात.

https://amzn.to/383FTu2

8. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा (AMVI)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या  अखत्यारीतील सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट-क) संवर्गातील पदे या परीक्षेमधून भरले जातात. मेकॅनिकल अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) तसेच मेकॅनिकल अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी असणारे उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात.

https://amzn.to/2Wa69xa

9. सरळ सेवा भरती

वरील परीक्षा व्यतिरिक्त  महाराष्ट्र लोकसेवा आयोग अनेक पदांसाठी सरळ सेवा परीक्षा पद्धती राबविते. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या अखत्यारीतील काही ठराविक गट-अ आणि गट-ब पदांची भरती सरळ सेवेतून होते.

अधिकृत संकेतस्थळ – www.mpsc.gov.in



STAFF SELECTION COMMISSION (SSC)

स्टाफ सिलेक्शन कमिशन हे कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाचे संलग्न कार्यालय आहे. केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयातील गट ब, क आणि काही गट ड पदांसाठी परीक्षा आयोजित करून उमेदवारांची निवड संबंधित मंत्रालयाला कळविणे हे या आयोगाचे कार्य आहे.

1. COMBINED GRADUATE LEVEL EXAMINATION (SSC-CGL)

युपीएससी नागरी सेवा परीक्षा पाठोपाठ देश पातळीवर अत्यंत महत्वाची समजली जाणारी ही दुसरी परीक्षा आहे. सीजीएल या परीक्षेद्वारे केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयातील गट-अ, गट-ब आणि गट-क पदांची भरती केली जाते. इनकम टॅक्स इन्स्पेक्टर, परराष्ट्र मंत्रालयात असिस्टंट, केंद्रीय उत्पादन शुल्क इन्स्पेक्टर, असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर अशी विविध महत्वपूर्ण पदे या परीक्षेमधून भरली जातात.  कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/3a23v4I

2. COMBINED HIGHER SECONDARY LEVEL (CHSL) 10+2 EXAMINATION

एसएससी कडून घेतली जाणारी सीजीएल नंतर ही दुसरी महत्वाची परीक्षा आहे. सीएचएसएल या परीक्षेद्वारे केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयातील  गट-क पदांची भरती केली जाते. कनिष्ठ लिपिक, पोस्टल असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर अशी विविध महत्वपूर्ण पदे या परीक्षेमधून भरली जातात. कोणत्याही विद्याशाखेचा बारावी उत्तीर्ण उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/3mcamLn

3. MULTITASKING (NON-TECHNICAL) STAFF EXAMINATION

केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयातील गट-क आणि गट-ड पदांची भरती या परीक्षेद्वारे केली जाते. ऑपरेटर, शिपाई, गेटकिपर, कनिष्ठ ऑपरेटर अशी विविध पदे या परीक्षेमधून भरली जातात. दहावी उत्तीर्ण उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/3gNiwZt

4. IMD SCIENTIFIC ASSISTANT EXAMINATION

वैज्ञानिक सहाय्यक हे भारतीय हवामानशास्त्र विभागातील पद आहे. आयएमडी विशिष्ट संशोधनाशी संबंधित संशोधन आणि शैक्षणिक विषयात वैज्ञानिकांना सहाय्य करणे हे वैज्ञानिक सहाय्यकांचे त्यांचे प्रमुख कार्य आहे. भौतिकशास्त्र विषयातील पदवीधर , बी.ई , बी.टेक तसेच इलेक्ट्रॉनिक विषयातील पदविका (डिप्लोमा) असणारे उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/37emtn0

5. STENOGRAPHERS GRADE C & D EXAMINATION

या परीक्षेद्वारे केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयांसाठी स्टेनोग्राफर हे पद भरले जाते. कोणत्याही विद्याशाखेचा बारावी उत्तीर्ण  उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/344k8Zy

6. CONSTABLES (GD) EXAMINATION

अ. सीमा सुरक्षा दल (BORDER SECURITY FORCE – BSF)

ब. केंद्रीय राखीव पोलीस दल – (CENTRAL RESERVE POLICE FORCE – CRPF)

क. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल – (CENTRAL INDUSTRIAL SECURITY FORCE – CISF)

ड. इंडो - तिबेटियन सीमा पोलीस दल – (INDO-TIBETIAN BORDER POLICE – ITBF)

इ. सशस्त्र सीमा बल – (SASHASTRA SEEMA BAL – SSB)

ई. राष्ट्रीय तपास यंत्रणा – (NATIONAL INVESTIGATION AGENCY – NIA)

वरील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षा घेण्याचे कार्य एस.एस.सी  करते. या परीक्षेसाठी योग्य शारीरिक पात्रता असणारे आणि दहावी उत्तीर्ण  उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/37YZnjm

7. JUNIOR ENGINEER EXAMINATION

केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयातील तांत्रिक कार्यासाठी कनिष्ठ पातळीवरील पदे भरण्याची जबाबदारी एस.एस. सी वर आहे. केंद्रीय जल आयोग, सार्वजनिक बांधकाम मंत्रालय, टपाल विभाग, सीमा रस्ते विकास विभाग तसेच इतर विभागातील कनिष्ठ अभियंता हे पद या परीक्षेद्वारे भरले जाते. अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) तसेच अभियांत्रिकी पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/2ILabJi

8. JUNIOR HINDI TRANSLATORS EXAMINATION

केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयातील हिंदी अनुवादक या पदासाठी ही परीक्षा घेतली जाते. कनिष्ठ हिंदी अनुवादक असे या पदाचे नाव असते. हिंदीसह इंग्रजी विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त असणारे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3gEQOxU

9. FOOD CORPORATION OF INDIA EXAMINATION

भारतीय अन्न महामंडळ ही एक भारत सरकार द्वारा निर्मित आणि चालविली जाणारी संस्था जाते. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ही एक वैधानिक संस्था आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्नधान्याच्या साठ्यांचे समाधानकारक स्तर राखणे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी देशभर धान्य वाटप करणे या संस्थांचे कार्य आहे. भारतीय अन्न महामंडळासाठी नोकरभरती करण्याचे कार्य एस.एस.सी कडे आहे. एस.एस.सी भारतीय अन्न महामंडळासाठी विविध गट-ब, गट-क आणि गट-ड पदांची भरती दरवर्षी करते. बी.एस.सी, अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा), अभियांत्रिकी पदवी तसेच इतर पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/2Kh3Khp

10. DIRECT RECRUITMENT EXAMINATION

वरील परीक्षा व्यतिरिक्त एसएससी अनेक पदांसाठी सरळ सेवा परीक्षा पद्धती राबविते. केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयांसाठी गट-ब, गट-क आणि गट-ड पदांची भरती सरळ सेवेतून होते.

अधिकृत संकेतस्थळ – www.ssc.nic.in


 

MINISTRY OF HOME AFFAIRS

केंद्रीय गृहमंत्रालय काही मोजक्या पदांसाठी परीक्षा आयोजित करते. प्रामुख्याने गुप्तचर संघटनेसाठी पद भरती करण्याचे अधिकार गृहमंत्रालयाने स्वतःकडे ठेवले आहेत.

1. ASSISTANT CENTRAL INTELLIGENCE OFFICER EXAMINATION (IB)

केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे काही मोजक्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. ज्यांना देशाच्या गुप्तचर संघटनांमध्ये काम करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा एक सुवर्ण संधी आहे. देशाची अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षेसंबंधी गुप्तचर माहिती गोळा करणे तसेच कार्यवाही करणे हे आपल्या देशाच्या ' इंटेलिजन्स ब्युरो'  या संघटनेचं कार्य आहे. या परीक्षेद्वारे या संघटनेतून काम करण्याची संधी मिळते. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/3gHoxXz

2. SECURITY ASSISTANT EXAMINATION (IB)

'इंटेलिजन्स ब्युरो' या संघटनेतून काम करण्यासाठी असणाऱ्या संधी पैकी ही दुसरी परीक्षा आहे. या परीक्षेसाठी दहावी उत्तीर्ण तसेच स्थानिक भाषा येणारा उमेदवार अर्ज करू शकतो.

https://amzn.to/2IO0Zny

अधिकृत संकेतस्थळ – www.mha.gov.in

 

RAILWAY RECRUITMENT BOARD

रेल्वे भरती नियंत्रण मंडळ (आरआरबी) ही एक सरकारी संस्था आहे. ही संस्था १९९८ मध्ये रेल्वे मंत्रालय अंतर्गत, नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आली. भारतीय रेल्वेमध्ये काम करण्यासाठी नवीन कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचे व्यवस्थापन करण्याचे काम हे आरआरबी करतात. भारताच्या वेगवेगळ्या भागात (झोन प्रमाणे) २१ आरआरबी बोर्ड आहेत.

1. ASSISTANT LOCO PILOT (ALP) EXAMINATION

असिस्टंट लोको पायलट (एएलपी) हे भारतीय रेल्वे मधील गट-क सेवेतील पद आहे. एएलपी हा रेल्वे चालकास रेल्वे चालवण्यास मदत करतो. सिग्नल पाठविणे, लोको योग्य प्रकारे चालत आहे का हे  सुनिश्चित करणे आणि  किरकोळ दुरुस्तीसाठी वरिष्ठांना मदत करणे यासंबंधित विविध जबाबदाऱ्या पार पाडणे हे एएलपीचे कर्तव्य आहे. या परीक्षेसाठी आयटीआय तसेच अभियांत्रिक पदविका (डिप्लोमा) झालेले उमेदवार अर्ज करू शकतो.

https://amzn.to/3nfsWDt

2. JUNIOR ENGINEER (JE) EXAMINATION

रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणारे विभाग प्रामुख्याने तांत्रिक असल्याने अभियंत्यांची गरज भासते. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड   यासाठी कनिष्ठ अभियंता हे पद भरते .या परीक्षेसाठी पदविका (डिप्लोमा),बी.एस.सी (कॉम्पुटर सायन्स), बी.सी.ए, बी.टेक (कॉम्पुटर सायन्स) ही शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार  ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/37cli7B

3. RRB NTPC EXAMINATION (NON TECHNICAL POPULAR CATEGORIES)

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड तर्फे अतांत्रिक पदांसाठी घेतली जाणारी ही सर्वात मोठी आणि महत्वाची परीक्षा आहे. स्टेशन मास्तर, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ तिकीट लिपिक ,कनिष्ठ लिपिक, तिकीट कलेक्टर इत्यादी पदांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. कोणत्याही विद्याशाखेचा बारावी उत्तीर्ण (५०%),पदवीधर उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/3mjGYD6

4. RRB GROUP D EXAMINATION

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड  तर्फे गट-ड पदांसाठी एकत्रित परीक्षा घेतली जाते. स्टोर असिस्टंट ,इलेक्ट्रिकल असिस्टंट, ट्रॅफिक असिस्टंट, मेकॅनिकल असिस्टंट इत्यादी पदांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. दहावी उत्तीर्ण सह आय.टी.आय किंवा अभियांत्रिकी पदविका असणारे उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो. 

https://amzn.to/3492pAl

अधिकृत संकेतस्थळ – www.rrbcdg.gov.in/other-rrb.php

 


RESERVE BANK OF INDIA (RBI)

१ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते तसेच चलनविषयक धोरण तयार करते. नागपूर, जयपूर, हैदराबाद, भोपाळसह एकूण १९ ठिकाणी आरबीआयचे क्षेत्रीय कार्यालय आहेत. मुख्य कार्यालयासह या क्षेत्रीय कार्यालयांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासते. यासाठी पदभरती करून घेणायचे कार्य स्वतः आरबीआय करते.

1. RBI GRADE B EXAMINATION

ग्रेड-बी साठी एकूण ३ विविध पदांसाठी आरबीआय परीक्षा आयोजित करते. यातील एक पद हे सामान्य प्रशासन संबंधी असते. आरबीआय मध्ये तीसच्या वरती विभाग आहेत. कोणत्या विभागामध्ये नियुक्ती होईल त्यानुसार या पदांचे कार्य ठरते. ६० % मार्क्स असणारे पदवीधर आणि अर्थशाश्त्र किंवा संख्याशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त असणारे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3a69XI4

2. RBI ASSISTANT EXAMINATION

आरबीआय कार्यालयांच्या विविध विभागात सहाय्य करण्यासाठी सहाय्यकांची नेमणूक केली जाते. कोणत्या विभागामध्ये नियुक्ती होईल त्यानुसार डेटा एंट्री, बँकिंग कागदपत्र पडताळणी, सरकारी ट्रेझरी वर्क, इत्यादी कार्य ठरते. ५५% मार्क्स असणारे पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/37VmhYJ

3. RBI GRADE C EXAMINATION

ग्रेड-सी साठी एकूण १६ विविध पदांसाठी आरबीआय परीक्षा आयोजित करते. ही पदे प्रामुख्याने पर्यवेक्षी व्यवस्थापक, बँक परीक्षक, विश्लेषक, प्रशासक अशी व्यवस्थापकीय कार्याशी संबंधित आहेत. उच्च शैक्षणिक पात्रतेसह बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणे हे या परीक्षेसाठी अनिवार्य आहे.

https://amzn.to/37eB6qp

अधिकृत संकेतस्थळ – www.rbi.org.in



इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (INSTITUTE OF BANKING PERSONNEL SELECTION – IBPS)

भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय वित्तीय संस्था आणि सार्वजनिक बँकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही एक स्वायत्त संस्था आहे. आयबीपीएस सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एसबीआय च्या सहकारी बँक, आरबीआय, नाबार्ड, एसआयडीबीआय, एलआयसी आणि विमा कंपन्या आणि आयबीपीएस संस्थेच्या नियमित सदस्य बँकांना भरती सेवा प्रदान करते.

1. IBPS PROBATIONARY OFFICERS EXAMINATION (IBPS-PO)

बँक पीओ २ वर्षाच्या प्रशिक्षण कालावधी नंतर सहाय्यक व्यवस्थापक या पदावर काम करतात. प्रोबेशन कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, पीओंना रोजच्या ग्राहकांच्या व्यवहाराची कामे हाताळण्यासाठी सहाय्यक बँक व्यवस्थापक म्हणून कोणत्याही बँकेच्या शाखेत नियुक्त केले जाते. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/37a8xu8

2. IBPS CLERICAL EXAMINATION

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) दरवर्षी सार्वजनिक क्षेत्रातील ११ बँकांमध्ये कारकुनी संवर्ग पदासाठी उमेदवार निवडण्यासाठी एक कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (सीआरपी) आयोजित करते. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/3qTTBbw

3. IBPS SPECIALISTS OFFICERS EXAMINATION (IBPS-SO)

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) आयटी, कृषी क्षेत्र, राजभाषा अधिकारी, कायदा, मानव संसाधन, विपणन अशा सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांमध्ये तज्ज्ञ अधिकारी भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (सीआरपी) आयोजित करते. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी आयबीपीएसने नमूद केलेल्या किमान पात्रतेच्या निकषांची पूर्तता केली पाहिजे. विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रतेची अट आहे.

https://amzn.to/3462yog

4. IBPS REGIONAL RURAL BANKS EXAMINATION

प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) भारतीय अनुसूचित वाणिज्य बँका आहेत (सरकारी बँका) भारताच्या विविध राज्यांत प्रादेशिक स्तरावर कार्यरत आहेत. मूलभूत बँकिंग आणि वित्तीय सेवांसह प्रामुख्याने ग्रामीण भागात सेवा देण्याच्या उद्देशाने त्यांची निर्मिती १९७५ साली केली गेली आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील विविध पदांची भरती या परीक्षेद्वारे होते. कृषी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, मत्स्य पालन, कृषी विपणन व सहकारिता, अर्थशास्त्र या विषयातील पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/2IJ3Huv

अधिकृत संकेतस्थळ – www.ibps.in

 


STATE BANK OF INDIA

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय, सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग आणि वित्तीय सेवा देणारी वैधानिक संस्था आहे जिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. एसबीआय जगातील ४३ व्या क्रमांकाची बँक आहे आणि २०१९ च्या जगातील सर्वात मोठ्या महामंडळांच्या फॉर्च्युन ग्लोबल ५०० यादीमध्ये २३६ व्या स्थानावर आहे. एसबीआय ही एक राष्ट्रीयकृत बँक असून एकूण कर्ज आणि ठेवी बाजाराच्या २५% वाटा असणारी ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआय पदभरती साठी खालील परीक्षा स्वतंत्रपणे आयोजित करते.

1. SBI PROBATIONARY OFFICERS EAMINATION (SBI-PO)

नियोजन, अर्थसंकल्प, विपणन, कर्ज प्रक्रिया आणि मान्यता, गुंतवणूक व्यवस्थापन, कारकुनांच्या कामावर देखरेख ठेवणे, बँकेच्या फायद्यासाठी निर्णय घेणे, रोखीची रक्कम शिल्लक ठेवणे इत्यादी व्यवस्थापकीय कामे बँक पीओंना करावी लागतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या धर्तीवर एसबीआय पीओ परीक्षेसाठी उमेदवाराला मर्यादित प्रयत्न दिलेले असतात. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/2Lroh3n

2. SBI JUNIOR ASSOCIATES EXAMINATION (SBI-JA)

एसबीआय कनिष्ठ सहायक म्हणून भरती झालेल्या उमेदवारांना लिपिक, रोखपाल, ठेवीदार आणि इतर पदांवर नियुक्त केले जाते. कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

https://amzn.to/3oLgjAt

3. SBI SPECIALIST OFFICERS EXAMINATION (SBI-SO)

स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे एसबीआय एसओ परीक्षा आयोजित केली जाते. एसबीआय विविध विभागांमधील रिक्त जागांनुसार तज्ञ अधिकारी (एसओ) भरतीसाठी अर्ज मागवते. सर्वसाधारणपणे व्यवस्थापकीय पदांसाठी ही भरती घेतली जाते. विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रतेची अट आहे.

https://amzn.to/3oO45Y6

अधिकृत संकेतस्थळ – www.sbi.co.in/web/careers

 


INDIAN ARMY

भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहे. भारतीय पायदळात १३,२५,००० नियमित सैनिक व ११,५५,००० राखीव सैनिक आहेत. भारतीय लष्कर हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान ,आधुनिक पद्धती ,आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे.

भारतीय सैन्यात एसएससी किंवा शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे अधिकाऱ्यांचा कार्यकाळ. एसएससी शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकाऱ्यांचा कार्यकाळ १०+४ वर्षे आहे. हा कार्यकाळ संपल्यानंतर पुरुष अधिकारी एकतर कायमस्वरुपी कमिशनची निवड करू शकतात किंवा भारतीय सैन्यातून बाहेर पडू शकतात.

भारतीय सैन्यामध्ये अधिकारी पदावर नियुक्ती होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला सेवा निवड मंडळच्या (एसएसबी) मूल्यांकनास सामोरे जावे लागते. सेवा निवड मंडळ (एसएसबी) ही एक संघटना आहे जी भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांचे मूल्यांकन करते. एसएसबीमध्ये मूल्यांकनकर्ता, जे भारतीय सशस्त्र दलात अधिकारी आहेत आणि मानसशास्त्रज्ञ, जीटीओ (ग्रुप टास्क ऑफिसर) आणि मुलाखत अधिकारी म्हणून त्यांचे विशेषज्ञ आहेत अशा पॅनेलचा समावेश आहे.

बंगलोर, भोपाळ, अलाहाबाद(प्रयागराज) आणि कपूरथळा चार शहरांमध्ये भारतीय सैन्यदलासाठी उमेदवारांचे एसएसबी मूल्यांकन केले जाते. उमेदवारास कोणत्याही एका ठिकाणी मूल्यांकनास बोलावले जाते. खालील परीक्षा या भारतीय सैन्याकडून अधिकारी पदासाठी घेतल्या जातात.

1. SSC JAG MEN EXAMINATION

कायदा (एलएलबी) पदवी ५५% पेक्षा जास्त अशी शैक्षणिक अर्हता असणारे पुरुष उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

2. SSC NCC SPECIAL ENTRY MEN EXAMINATION

'अ' श्रेणीतील एनसीसी प्रमाणपत्रासह पदवी ५०% पेक्षा जास्त अशी शैक्षणिक अर्हता असणारे पुरुष उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

3. TECHNICAL ENTRY SCHEME EXAMINATION (10+2)

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह बारावी ७०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण असणारे पुरुष उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

4. UNIVERSITY ENTRY SCHEME EXAMINATION

अभियांत्रिकी पदवी (बी.ई./बी.टेक.) शैक्षणिक अर्हता असणारे पुरुष उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 

5. TGC ENGINEERS EXAMINATION

अभियांत्रिकी पदवी (बी.ई./बी.टेक.) शैक्षणिक अर्हता असणारे पुरुष उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 

6. SSC TECHNICAL MEN EXAMINATION

अभियांत्रिकी पदवी (बी.ई./बी.टेक.) शैक्षणिक अर्हता असणारे पुरुष उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 

7. AEC MEN EXAMINATION

एम.ए किंवा एम.एससी पहिल्या किंवा दुसऱ्या श्रेणी मध्ये उत्तीर्ण शैक्षणिक अर्हता असणारे पुरुष उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 

8. MILITARY NURSING SERVICE EXAMINATION

बी.एससी (नर्सिंग) किंवा एम.एससी (नर्सिंग) किंवा पी.बी. बी.एससी (नर्सिंग) अशी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या महिला उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 

9. SSCW NCC SPECIAL ENTRY WOMEN EXAMINATION

'अ' श्रेणीतील एनसीसी प्रमाणपत्रासह पदवी ५०% पेक्षा जास्त अशी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या महिला उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 

10. SSCW JAG WOMEN EXAMINATION

कायदा (एल.एल.बी) पदवी ५५% पेक्षा जास्त अशी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या महिला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 

11. SSC TECHNICAL WOMEN EXAMINATION

अभियांत्रिकी पदवी (बी.ई./बी.टेक.) शैक्षणिक अर्हता असणाऱ्या महिला उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3qKymJ3

अधिकृत संकेतस्थळ – www.joinindianarmy.nic.in

 


INDIAN NAVY

१७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.

भारतीय नौदलामध्ये अधिकारी पदावर नियुक्ती होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला सेवा निवड मंडळच्या (एसएसबी) मूल्यांकनास सामोरे जावे लागते. सेवा निवड मंडळ (एसएसबी) ही एक संघटना आहे जी भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांचे मूल्यांकन करते. एसएसबीमध्ये मूल्यांकनकर्ता, जे भारतीय सशस्त्र दलात अधिकारी आहेत आणि मानसशास्त्रज्ञ, जीटीओ (ग्रुप टास्क ऑफिसर) आणि मुलाखत अधिकारी म्हणून त्यांचे विशेषज्ञ आहेत अशा पॅनेलचा समावेश आहे.

बंगलोर, भोपाळ, विशाखापट्टणम आणि कोलकाता या चार शहरांमध्ये भारतीय नौदलासाठी उमेदवारांचे एसएसबी मूल्यांकन केले जाते. उमेदवारास कोणत्याही एका ठिकाणी मूल्यांकनास बोलावले जाते. खालील परीक्षा या भारतीय नौदलाकडून अधिकारी पदासाठी घेतल्या जातात.

1. UNDERGRADUATE LEVEL ENTRY EXAMINATION

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह बारावी ७०% पेक्षा जास्त गुण तसेच इंग्रजी विषयात ५०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण असणारे पुरुष आणि महिला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

2. NCC SPECIAL ENTRY EXAMINATION

'अ' श्रेणीतील एनसीसी प्रमाणपत्रासह अभियांत्रिकी पदवी (बी.ई./बी.टेक.) अशी शैक्षणिक अर्हता असणारे पुरुष आणि महिला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/381njlY

3. INDIAN NAVY ENTRANCE TEST (INET)

इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट (आयएनईटी) स्थायी कमिशन (पीसी) आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) या दोन्ही कार्यकाळासाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी सामायिक परीक्षा आहे. भारतीय नौदलाकडून घेतली जाणारी ही सर्वात मोठी आणि महत्वाची परीक्षा आहे. आयएनईटी वर्षातून दोनदा घेण्यात येते. एकूण १२ तांत्रिक आणि अतांत्रिक अशी विविध पदे या सामायिक परीक्षेतून भरली जातात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह बारावी, अभियांत्रिकी पदवी (बी.ई./बी.टेक.) आणि इतर विषयातील पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. पदानुसार शैक्षणिक अर्हता वेगवेळी आहे. गुणवत्ता यादी आयएनईटी (५०%) आणि एसएसबी (५०%) च्या एकत्रित गुणांवर आधारित असते.

https://amzn.to/37dTRKg

अधिकृत संकेतस्थळ – www.joinindiannavy.nic.in

 


INDIAN AIR FORCE

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते. भारतीय वायुसेनेत अधिकारी होण्यासाठी खालील परीक्षा द्यावी लागते.

1. NCC SPECIAL ENTRY EXAMINATION (FOR MEN & WOMEN) (FLYING BRANCH)

१०+२ पातळीवर गणित व भौतिकशास्त्रातील प्रत्येकी किमान ५०% गुण. कोणत्याही विषयातील पदवी ६०% गुणांनी उत्तीर्ण आणि 'अ' श्रेणीतील एनसीसी प्रमाणपत्र असणारे पुरुष आणि महिला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 

2. AIR FORCE COMMON ADMISSION TEST (AFCAT)

एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) भारतीय वायुसेनेद्वारे घेतली जाते. वायुसेनेद्वारे घेतली जाणारी ही सर्वात मोठी आणि महत्वाची परीक्षा आहे. फ्लाइंग आणि ग्राऊंड डयुटी (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) मधील वर्ग -१ राजपत्रित अधिकारी निवडण्यासाठी वर्षातून दोनदा अनुक्रमे फेब्रुवारी आणि ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येते.  स्थायी कमिशन (पीसी) आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) या दोन्ही कार्यकाळासाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी ही एक सामायिक परीक्षा आहे.  ऑनलाईन परीक्षा आणि एअरफोर्स सिलेक्शन बोर्डच्या (AFSB) मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते. ग्राऊंड ड्यूटी (टेक्निकल) शाखांसाठी निवड करणाऱ्या उमेदवारांना एएफसीएटी आणि अभियांत्रिकी नॉलेज टेस्ट (EKT) दोन्ही परीक्षा देणे आवश्यक आहे.

फ्लाइंग ब्रांच साठी १० + २ पातळीवर गणित व भौतिकशास्त्रातील प्रत्येकी किमान ६०% गुण तसेच बी.ई./बी.टेक किंवा कोणत्याही विषयातील पदवी ६०% गुणांनी उत्तीर्ण असणारे पुरुष आणि महिला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.  ग्राऊंड डयुटी (टेक्निकल) साठी अभियांत्रिकी (बी.ई./बी.टेक.) पदवी असणारे पुरुष आणि महिला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ग्राऊंड डयुटी (नॉन-टेक्निकल) साठी विविध विभांगांसाठी विविध शैक्षणिक पात्रता आहे.

https://amzn.to/3oJcgEU

अधिकृत संकेतस्थळ – www.careerindianairforce.cdac.in

 


LIFE INSURANCE CORPORATION (LIC)

भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) भारत सरकारच्या मालकीचे गुंतवणूक महामंडळ आहे.  आज एलआयसी कडे २०४८ पूर्णपणे संगणकीकृत शाखा कार्यालये, ८ विभागीय कार्यालये, सुमारे ११३ विभागीय कार्यालये आहेत.  एलआयसी त्यांच्या कंपनीत भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा घेते.

1. LIC ASSISATANT ADMINISTRATIVE OFFICER EXAMINATION (AAO)

एलआयसी एएओ ही विमा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे. कायदा, आय.टी., राजभाषा, सी.ए आणि सामान्य विभागांसाठी सहायक प्रशासकीय अधिकारी (एएओ) हे पद भरले जाते. कायदा (एल.एल.बी) पदवी, अभियांत्रिकी (आय.टी., इलेक्ट्रॉनिक, कॉम्पुटर सायन्स) पदवी, सी.ए, पदव्युत्तर पदवी (हिंदी, इंग्रजी किंवा संस्कृत) तसेच इतर पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/2JPaFPe

2. LIC HOUSING FINANCE LIMITED EXAMINATION (HFL)

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एलआयसी एचएफएल) ही सरकारी मालकीची भारतातील मोठ्या गृहनिर्माण वित्त कंपनी पैकी एक कंपनी आहे. एलआयसी एचएफएल साठी सहायक, सहयोगी आणि सहायक व्यवस्थापक अशा तीन विविध पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. सहायक पदासाठी ५५% गुणांसह पदवी, सहयोगी पदासाठी ६०% गुणांसह पदवी व सी.ए (इंटर), सहायक व्यवस्थापक या पदासाठी ६०% गुणांसह पदवी व एम.बी.ए शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

https://amzn.to/349RIxA

3. LIC DIRECT SALES EXECUTIVES EXAMINATION (DSE)

एलआयसीमध्ये डायरेक्ट सेल्स एक्झिक्युटिव्ह (डीएसई) ची प्राथमिक नोकरी बहुतेक मार्केटींग संबंधी (विपणन संबंधी) असते. त्यांना नवीन व्यवसाय आणावा लागते, ग्राहकांना भेटावे लागते आणि वाटप केलेल्या क्षेत्रातील ग्राहकांना विमा संबंधित सेवा द्याव्या लागतात.  कोणत्याही विषयातील पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.

https://amzn.to/3qTlq3p

4. LIC INSURANCE REGULATORY DEVELOPMENT AUTHORITY EXAMINATION

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ही एक स्वायत्त, वैधानिक संस्था आहे जी भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे नियमन आणि प्रसार करते. आयआरडीएआय च्या कार्यालयीन कामांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज या परीक्षेद्वारे पूर्ण केली जाते. गट-ब. गट-क आणि गट-ड अशा विविध पदांची भरती या परीक्षेदवरे केली जाते. पदानुसार बारावी उत्तीर्ण, पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी असणारे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3a1kWSZ

5. LIC DEVELOPMENT OFFICER EXAMINATION

विकास अधिका-याची प्राथमिक कर्तव्य म्हणजे विमा एजंटांची भरती करणे आणि त्यांना भक्कम कार्यसंघ बनवणे, आणि विमा एजंटकडून जास्तीसजास्त व्यवसाय आणणे. विमा एजंट अर्धवेळ किंवा पूर्णवेळ काम करू शकतात. विमा एजंट हे एलआयसीचे कर्मचारी नसतात. कोणत्याही विषयातील पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.

https://amzn.to/3oMFNxm

अधिकृत संकेतस्थळ – www.licindia.in

 

GENERAL INSURANCE CORPORATION (GIC)

सामान्य विमा व्यवसाय (राष्ट्रीयकरण) अधिनियम,१९७२ द्वारे भारतातील संपूर्ण सामान्य विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण झाले होते. १९७२ च्या या कायद्याद्वारे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (जीआयसी) ची स्थापना करण्यात आली.

भारतीय विमा कंपन्यांमध्ये विलीनीकरणाच्या प्रक्रियेनंतर खालील चार कंपन्या जीआयसीच्या पूर्णपणे मालकीच्या सहाय्यक कंपन्या म्हणून राहिल्या.

NEW INDIA ASSURANCE COMPANY LIMITED (NIACL)

NEW INSURANCE COMPANY LIMITED (NICL)

ORIENTAL INSURANCE COMPANY LIMITED (OICL)

UNITED INDIA INSURANCE COMPANY LIMITED (UIIC)

जीआयसी त्यांच्या कंपनीत भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा घेते.

1. GIC ASSISATANT ADMINISTRATIVE OFFICER EXAMINATION (AAO)

एएओ कार्य हे प्रशासकीय प्रक्रिया हाताळण्याचे असते ज्यात नवीन योजना आखणे, धोरणांचे निरीक्षण करणे अशा कामांचा समावेश असू शकतो.  वित्त/लेखा,नवीन व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान (आयटी), पॉलिसी सर्व्हिसिंग, दावे, विपणन/विक्री अशा विविध विभागांमध्ये नियुक्ती होऊ शकते. बाकी सर्व चार सहाय्यक कंपन्यांच्या एएओ चे कार्यही अशाच पद्धतीचे असते. ६०% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3a4kxz7

2. GIC ASSISTANT MANAGER EXAMINATION

वित्त, माहिती तंत्रज्ञान, कायदा विभाग, ऑटोमोबाईल इंजिनियरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग, एरोनॉटिकल इंजिनियरिंग, मरीन इंजिनियरिंग, कंपनी सिक्रेटरी, हिंदी अशा विविध विभागांसाठी या पदाची भरती केली जाते. पदानुसार शैक्षणिक अर्हता वेगवेगळी आहे.

अधिकृत संकेतस्थळ – www.gicofindia.com

 

NEW INDIA ASSURANCE COMPANY LIMITED (NIACL)

जीआयसीच्या पूर्णपणे मालकीच्या चार सहाय्यक कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे.

1. NIACL ADMINISTRATIVE OFFICERS EXAMINATION (AO)

एनआयएसीएल एओच्या परीक्षेसाठी आवश्यक किमान पात्रता कोणत्याही विषयात ६०% गुणांसह पदवीधर  असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमातीसाठी ते ५५% आहे. काही विशिष्ट पदांसाठी कायदा, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील पदवी आवश्यक आहे.

https://amzn.to/37b7Xw0

2. NIACL ASSISATANT EXAMINATION

कोणत्याही विषयातील पदवीधर परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.

https://amzn.to/2JSicga

अधिकृत संकेतस्थळ – www.newindia.co.in/portal/readMore/Recruitment

NEW INSURANCE COMPANY LIMITED (NICL)

जीआयसीच्या पूर्णपणे मालकीच्या चार सहाय्यक कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे.

1. NICL ADMINISTRATIVE OFFICERS EXAMINATION (AO)

एनआयसीएल एओ च्या परीक्षेसाठी आवश्यक किमान पात्रता कोणत्याही विषयात ६०% गुणांसह पदवीधर  असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमातीसाठी ते ५५% आहे. काही विशिष्ट पदांसाठी कायदा, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील पदवी आवश्यक आहे.

https://amzn.to/2W9AVWX

2. NICL ASSISATANT EXAMINATION

कोणत्याही विषयातील पदवीधर परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.

https://amzn.to/3n9ARCm

अधिकृत संकेतस्थळ – www.nationalinsurance.nic.co.in/en/recruitments

ORIENTAL INSURANCE COMPANY LIMITED (OICL)

जीआयसीच्या पूर्णपणे मालकीच्या चार सहाय्यक कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे.

1. OICL ADMINISTRATIVE OFFICERS EXAMINATION

ओआयसीएल एओ च्या परीक्षेसाठी आवश्यक किमान पात्रता कोणत्याही विषयात ६०% गुणांसह पदवीधर  असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमातीसाठी ते ५५% आहे. काही विशिष्ट पदांसाठी कायदा, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील पदवी आवश्यक आहे.

https://amzn.to/37XEUeP

2. OICL ASSISATANT EXAMINATION

कोणत्याही विषयातील पदवीधर परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.

https://amzn.to/2KhRM7e

अधिकृत संकेतस्थळ – www.orientalinsurance.org.in/careers

UNITED INDIA INSURANCE COMPANY LIMITED (UIIC)

जीआयसीच्या पूर्णपणे मालकीच्या चार सहाय्यक कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे.

1. UIIC ADMINISTRATIVE OFFICERS EXAMINATION

युआयआयसी एओ च्या परीक्षेसाठी आवश्यक किमान पात्रता कोणत्याही विषयात ६०% गुणांसह पदवीधर  असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमातीसाठी ते ५५% आहे. काही विशिष्ट पदांसाठी कायदा, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील पदवी आवश्यक आहे.

https://amzn.to/3mfb36H

2. UIIC ASSISATANT EXAMINATION

कोणत्याही विषयातील पदवीधर परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.

https://amzn.to/2KeDW5z

अधिकृत संकेतस्थळ – www.uiic.co.in/en/careers/recruitment

 


CENTRE FOR PERSONNEL TALENT MANAGEMENT (CEPTAM – DRDO)

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या नावाने प्रसिद्ध असलेल्या या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणार्‍या अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या साहाय्याने नवीन चाचणी घेणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करते.

डीआरडीओ सीईपीटीएएम संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) च्या सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (सीईपीटीएएम) द्वारे आयोजित केले जाते. सीईपीटीएएम तांत्रिक, प्रशासकीय व इतर प्रवर्गातील  राजपत्रित नसलेल्या कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी परीक्षा घेतो. सीईपीटीएएम ही डीआरडीओची डीआरटीओ केडर (तांत्रिक कर्मचारी) याची पूर्तता करण्यासाठी पर्सोनेल असेसमेंट सेंटर (पीईएसीई) म्हणून स्थापन केलेली डीआरडीओची एक कॉर्पोरेट संस्था आहे. तांत्रिक, प्रशासकीय व इतर प्रवर्गातील कर्मचारी भरती, मूल्यांकन व या संवर्गातील प्रशिक्षण सुलभ करण्यासाठी सीईपीटीएएम केंद्र जबाबदार आहे. खालील परीक्षा सीईपीटीएएम तर्फे घेण्यात येतात.

1. ADMIN & ALLIED EXAMINATION

या परीक्षेतून लिपिक, स्टेनोग्राफर, प्रशासकीय सहायक, स्टोर सहायक, सुरक्षा सहायक इत्यादी पदे भरली जातात. काही पदांना दहावी उत्तीर्ण तर बाकी इतर सर्व पदांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतो.

https://amzn.to/2W9TbiW

2. TECHNICIAN ‘A’ EXAMINATION

दहावी उत्तीर्ण सह आयटीआय (विविध ट्रेड) शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/2W6IZHW

3. TECHNICIAN STA ‘B’ EXAMINATION

बी.एस्सी (विविध विषय) किंवा अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/2WbTdXI

4. MULTI TASKING STAFF EXAMINATION

दहावी उत्तीर्ण उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3mfzUHi

अधिकृत संकेतस्थळ – www.drdo.gov.in/ceptam-notice-board

 

INDIAN SPACE RESEARCH ORGANISATION (ISRO)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, अशी मूलभूत संस्था आहे. फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे, सन १९६९ मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने, तिच्याकडे असलेल्या प्रक्षेपण यानांच्या ताफ्याच्या साहाय्याने, भारतातील व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण केले.अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे व त्याचा उपयोग विविध राष्ट्रीय कार्यात करणे हा इस्रोचा मूळ उद्देश होता. खालील विविध परीक्षा इस्रोतर्फे आयोजित केल्या जातात.

1. SCIENTIST/ENGINEER EXAMINATION

इस्रोच्या विविध तांत्रिक विभागात विविध विषयाशी संबंधित मनुष्यबळाची गरज असते. यासाठी इस्रो कनिष्ठ अभियंता/ कनिष्ठ वैज्ञानिक हे पद भरते. ६५% पेक्षा जास्त गुणांनी अभियांत्रिकी (बी.ई/बी.टेक) उत्तीर्ण उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3meRzz4

2. JUNIOR PERSONAL ASSISTANTS & STENOGRAPHERS EXAMINATION

प्रशासकीय कामांसाठी कनिष्ठ पातळीवरील पदे या परीक्षेतून भरले जातात. कोणत्याही विषयातील पदवीधर परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.

https://amzn.to/348B8hl

3. ADMINISTRATIVE OFFICER, ACCOUNT OFFICER & PURCHASE & STORES OFFICER EXAMINATION

प्रशासकीय कामांसाठी वरिष्ठ पातळीवरील पदे या परीक्षेतून भरले जातात. सी.ए, एमबीए, कॉमर्स तसेच इतर विषयातील पदव्युत्तर पदवी असणारे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

https://amzn.to/2KkNcFq

अधिकृत संकेतस्थळ – www.isro.gov.in/careers

 


EMPLOYEES STATE INSURANCE CORPORATION (ESIC)

कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) भारतीय कामगारांसाठी एक सामाजिक-आर्थिक सुरक्षा आणि आरोग्य विमा योजना आहे. ईएसआय अधिनियम १९४८ मधील नियम व कायद्यांनुसार हा निधी कर्मचार्‍यांच्या राज्य विमा निगम (ईएसआयसी) द्वारे व्यवस्थापित केला जातो. ईएसआयसी ही एक वैधानिक आणि भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी स्वायत्त संस्था आहे. ईएसआयसी चे रुग्णालय जवळपास सर्व राज्यात आहेत, आणि बहुतेक रुग्णालये संबंधित राज्य सरकारे चालवतात. याच बरोबर ईएसआयसीचे स्वतःचे ९ वैद्यकीय महाविद्यालये आणि २ दंत महाविद्यालये आहेत. ईएसआयसी खालील विविध परीक्षा आयोजित करत असते.

1. JUNIOR ENGINEER EXAMINATION

कनिष्ठ अभियंता या पदासाठी सिव्हिल इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर दोन वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे अनिवार्य आहे.

https://amzn.to/3oPGYMq

2. INSURANCE MEDICAL OFFICER EXAMINATION

या परीक्षेसाठी उमेदवाराकडे वैद्यकीय पार्श्वभूमी संबंधित पदवी असली पाहिजे.

3. STENOGRAPHER & UPPER DIVISION CLERK EXAMINATION

वरिष्ठ लिपिक पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असला पाहिजे.

https://amzn.to/2KjRVqK

4. MULTI TASKING STAFF EXAMINATION

या परीक्षेतून कनिष्ठ कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. दहावी उत्तीर्ण उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.

https://amzn.to/37WmDyh

अधिकृत संकेतस्थळ – www.esic.nic.in/recruitments

 

INDIAN POST

१५० वर्षांहून अधिक काळ, पोस्ट विभाग देशाच्या संप्रेषणाचा (दळणवळण) कणा आहे आणि त्याने देशाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मेल वितरित करणे, लहान बचत योजनांतर्गत ठेवी स्वीकारणे, टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा अंतर्गत जीवन विमा संरक्षण प्रदान करणे आणि बिल संग्रहण, विक्री यासारख्या किरकोळ सेवा प्रदान करणे इत्यादी आणि अशा अनेक प्रकारे पोस्ट विभागाने भारतीय नागरिकांच्या जीवनास स्पर्श केला आहे आणि करत आहे. १,५५,५३१ पोस्ट ऑफिससह, भारतीय पोस्ट विभागाकडे जगातील सर्वाधिक प्रमाणात वितरित पोस्टल नेटवर्क आहे. पोस्ट विभागातर्फे खालील परीक्षा आयोजित केल्या जातात.

1. GRAMIN DAK SEVAK EXAMINATION

टपाल खात्यात वेगवेगळी कामे हाताळण्यासाठी ग्रामीण डाक सेवक (ग्रामीण टपाल सेवा) जबाबदार आहे. शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर, मेल वितरक, मेल कॅरियर आणि पॅकर अशा भिन्न पदांवर ग्रामीण डाक सेवक कार्यरत असतात. परीक्षेसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

https://amzn.to/2JZsjj9

2. MULTI TASKING STAFF EXAMINATION

कुशल कारागीर, कार ड्राइवर इत्यादी विविध पदे या परीक्षेद्वारे भरली जातात. परीक्षेसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

https://amzn.to/3mdtnx4

अधिकृत संकेतस्थळ - www.indiapost.gov.in/VAS/Pages/Content/Recruitments.aspx?Category=Recruitment

 


वरील विविध शासकीय आयोग, शासकीय संस्था, केंद्रीय मंत्रालय किंवा शासकीय संघटना यांच्यातर्फे विविध पदांसाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. आतापर्यंत उमेदवारांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या माहितीनुसार केंद्र सरकारमध्ये दरवर्षी सरासरी १.२५ लाख जागा भरल्या जातात आणि यासाठी दरवर्षी २.५ ते ३ करोड उमेदवार विविध परीक्षेसाठी बसतात. अनेक उमेदवारांना अनेक परीक्षा द्व्यावा लागतात. उदाहरणात एखाद्या पदवीधर उमेदवाराने रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन अशा तीन एजन्सीच्या च्या तीन वेगळ्या परीक्षेंसाठी अर्ज केला आहे. तर त्या उमेदवाराला प्रत्येक एजन्सीच्या प्राथमिक चाळणी परीक्षेला सामोरे जावे लागेल, त्यातून उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षा द्यावी लागेल आणि पुन्हा मग मुलाखत!

केंद्रीय सरकारने नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (एनआरए) स्थापन करण्याचा निर्णय ऑगस्ट २०२० मध्ये घेतला आहे.



नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (एनआरए)

Ø  प्रस्तावित एनआरए केंद्र सरकारमधील विविध भरतींसाठी एकच प्रारंभिक चाळणी परीक्षा घेईल.

Ø  एनआरए एक सामायिक पात्रता परीक्षा (सीईटी) घेईल आणि सीईटी गुणांच्या आधारे उमेदवार संबंधित केंद्र शासनाच्या एजन्सीकडे रिक्त जागांसाठी अर्ज करू शकेल. थोडक्यात प्रत्येक एजन्सीच्या प्राथमिक चाळणी परीक्षा वेगवेगळ्या न होता एकच सीईटी घेतली जाईल व पुढे उमेदवारास ज्या एजन्सीच्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्या एजन्सीच्या मुख्य परीक्षेला बसता येईल.

Ø  सुरुवातीला एनआरए रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन गट-ब आणि गट-क पदांसाठी सीईटी घेणार आहे. नंतर पुढे हळूहळू इतर एजन्सीच्या परीक्षा एनआरए तर्फे घेतल्या जाणाऱ्या सीईटी मध्ये समावेश केला जाणार आहे.

Ø  पदवीधर, उच्च माध्यमिक (बारावी उत्तीर्ण) आणि मॅट्रिक (दहावी उत्तीर्ण) या शैक्षणिक पात्रतेवर आधारित असणाऱ्या पदांसाठी तीन सीईटी घेतल्या जातील.

Ø  रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन या संस्था बरखास्त न करता त्यांच्यावर मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेण्याची जबाबदारी दिली जाईल.

Ø  उमेदवारांना एनआरएची सीईटी देण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून देशातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रे सुरू केली जातील.

Ø  उमेदवाराचे सीईटीचे गुण निकाल जाहीर होण्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी वैध असतील आणि सीईटीच्या गुणांवर आधारित त्यादरम्यान होणाऱ्या संबंधित मुख्य परीक्षेसाठी बसता येईल.

Ø  एखादा उमेदवाराने जर एनआरएच्या जास्त सीईटी परीक्षा दिल्या असतील तर ज्या सीईटी मध्ये जास्त गुण असतील ते ग्राह्य धरले जातील.

Ø  एनआरएच्या सीईटी एकूण १२ भाषेत होणार आहेत.

Ø  एनआरएच्या सीईटी मुळे उमेदवाराचे वेळ, पैसे आणि ऊर्जा वाचणार आहे. विविध परीक्षांसाठी भरावे लागणारे शुल्क एकच सीईटी साठी भरावे लागेल.

Ø  पुढील तीन वर्षात हळूहळू एनआरएचे काम विस्तारले जाणार आहे.




इतर शासकीय पदभरती

द इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), द सेन्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अडवान्सड कंप्युटिंग (C-DAC), द एरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI)), ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्था (NIRD&PR), एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (EXIM), द नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI), या आणि अशा इतर काही शासकीय संस्था (केंद्रीय तसेच राज्य मंत्रालयांतर्गत येणाऱ्या संस्था) शासकीय पदभरती करतात. याव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य शासनाच्या मालकीच्या अनेक कंपन्या आहेत ज्यांना एकत्रितपणे आपण 'सार्वजनिक उद्योग' म्हणतो. कोल इंडिया लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अशा खूप साऱ्या कंपन्या केंद्र तसेच राज्य शासनाच्या मालकीच्या आहेत. 'सार्वजनिक उद्योग' असणाऱ्या कंपन्यांमध्ये तांत्रिक आणि सामान्य पदभरती मोठ्या प्रमाणात होत असते. या पदभरतीच्या जाहिराती प्रत्येक आठवड्याला प्रकाशित होणाऱ्या 'एम्प्लॉयमेंट न्यूज' मध्ये येत असतात.

अधिकृत संकेतस्थळ - www.employmentnews.gov.in

वरील माहिती जास्तीसजास्त अचूक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तरी काही छापील किंवा इतर चुका असल्यास अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शासकीय नोकऱ्यांसाठी संघर्ष करत असणाऱ्या युवक-युवतींना मनापासून शुभेच्छा.

 

                                                                                                                         

युपीएससी  नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि वन सेवेसाठी लागणाऱ्या संदर्भ पुस्तकांची सविस्तर यादी

MOST USEFUL BOOKS FOR UPSC CSE PREPARATION (ENGLISH MEDIUM)

To Buy Books Just click on link below names

For Prelims & Mains Examination - Common Books

➡26 Years UPSC IAS/ IPS Prelims Topic-wise Solved Papers 1 & 2 (1995 - 2020)

(Including Mains General studies & Essays Question Papers - 2013 to 2019)

https://amzn.to/37KPzcp

➡ NCERT BOOK SET ( TOTAL 40 BOOKS) ENLISH MEDIUM

https://amzn.to/2NZWWGz

➡ Ancient and Medieval India - POONAM DALAL DAHIYA (New edition)

https://amzn.to/36WszZ4

➡ A BRIEF HISTORY OF MODERN INDIA - SPECTRUM (2019-2020 Edition) (RAJIV AHIR)

https://amzn.to/2L9BbCY

➡ Certificate Physical And Human Geography; Indian Edition - G C LEONG

https://amzn.to/30yQsQf

➡ Indian Art and Culture - NITIN SINHANIA (Latest 3rd Edition)

https://amzn.to/3lWZNLQ

➡ Indian Polity 6th Edition - M LAXMIKANTH (Latest Edition)

https://amzn.to/2VSz8Wc

➡ Indian Economy- RAMESH SINGH (Latest 12th Edition 2020)

https://amzn.to/2VQrc7L

➡ Environment By Shankar IAS Academy (Latest 7th Edition 2020)

https://amzn.to/37CKTFq

➡ Oxford Student Atlas for India - Latest 3rd EDITION

https://amzn.to/36S4bYi

➡ General Knowledge 2021  - ARIHANT - MANOHAR PANDEY

https://amzn.to/33RJtGj

 

EXCLUSIVE BOOKS FOR MAINS EXAMINATION GENERAL STUDIES

FOR GENERAL STUDIES PAPER - 1

➡ Post Independence India - SONALI BANSAL

https://amzn.to/2XNZmwg

➡ Gandhi, Nehru, Tagore and Other Eminent Personalities of Modern India - SPECTRUM

https://amzn.to/32rJ5vI

➡ World History

By Krishnna Reddy TMH - https://amzn.to/2VXvnOZ

OR  By Norman Lowe -  https://amzn.to/36ZepGF

➡ Indian Society - M Senthil Kumar & S Rijesh

https://amzn.to/3lW3dPc

FOR GENERAL STUDIES PAPER - 2

➡ Challenge and Strategy: Rethinking India's Foreign Policy - RAJIV SIKRI

https://amzn.to/30Cl833   OR

➡ International Relations - PAVNEET SINGH

https://amzn.to/3qAcVtX

➡ Governance in India  - M.LAXMIKANTH

https://amzn.to/39SX7Ng

➡ Important Judgments that Transformed India - ALEX ANDREWS GEORGE

https://amzn.to/33TgB08

FOR GENERAL STUDIES PAPER - 3

➡ Challenges to Internal Security of India (Third Edition) - ASHOK KUMAR

https://amzn.to/3lZjK4O   OR

➡ Internal Security – Conflicts, Challenges and Strategies - IPS LOHIT MATANI

https://amzn.to/2IulfKK

FOR GENERAL STUDIES PAPER - 4

➡ Lexicon for Ethics, Integrity & Aptitude Latest Edition

https://amzn.to/2JBBXsg  OR

➡ Ethics, Integrity & Aptitude - G Subba Rao & P N ROY Chowdhury

https://amzn.to/3mWXtpJ  OR

➡ A Practical Approach to Ethics Integrity and Aptitude - D K BALAJI

https://amzn.to/3mWmlxP

THANK YOU

MPSC आणि परीक्षार्थींच्या व्यथा - एका विद्यार्थ्याचा संदेश

 का वाचू मी,, हे लिखाण???? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.. कारण की, लिखाण करणारा मी कोणी महान नाहीये.. खरतर,,एक स्पर्धा परिक्षा करणारा व्यक्...