आज २३ मार्च शहीद दिवस - तीन थोर क्रांतिकारकांनी याच दिवशी हसत हसत देशासाठी प्राण त्यागले.
सरदार भगतसिंग
सरदार भगतसिंग यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी झाला.
वयाच्या बाराव्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या जागेला भेट दिली.
लहानपणी ते गांधीजींच्या विचाराने प्रेरित होते. गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर भगतसिंगांचा गांधीजींच्या कार्यप्रणालीवरून विश्वास उडाला.
शालेय जीवनात सरदार भगतसिंग धार्मिक वृत्तीचे होते, पुढे ते नास्तिक झाले. 'मी नास्तिक का आहे?' हा मोठा लेख त्यांनी लिहला आहे.
स्वतःचा विवाह टाळण्यासाठी भगतसिंग घर सोडून कानपूरला निघून गेले होते.
सरदार भगतसिंग हे समाजवादी विचारसरणीचे क्रांतिकारक होते.
लाहोर मध्ये नॅशनल कॉलेज मध्ये असताना त्यांनी 'हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन' या क्रांतिकारक संघटनेच्या कार्यात सहभाग घेतला.
सरदार भगतसिंग यांच्या आग्रहाखातर पुढे याच संघटनेच्या नावामध्ये 'सोशालिस्ट' शब्द जोडण्यात आला. 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' म्हणून हि संघटना ओळखली जाऊ लागली.
१९२४ मध्ये बेळगाव येथे झालेल्या कॉंग्रेस अधिवेशनाला भगतसिंग 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून हजर होते.
भगतसिंग ज्यांना स्वतःचे प्रेरणास्थान मानायचे त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज हे एक होते. म्हणून १९२४ मध्ये बेळगाव अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी 'रायगडा'ला भेट दिली होती.
१९२६ मध्ये सरदार भगतसिंग यांनी 'नवजवान भारत सभा' या संघटनेची स्थापना केली.
'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत त्यांनी पत्रकार म्हणून थोड्या कालावधीसाठी काम केले होते.
लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने ब्रिटिश पोलिस अधीक्षक, जेम्स स्कॉट याला मारण्याचे नियोजन केले होते. १७ डिसेंबर, १९२८ रोजी भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्यास जेम्स स्कॉट समजून गोळ्या मारून ठार केले, परंतु तो ब्रिटिश पोलीस अधिकारी जेम्स स्कॉट नसून जॉन साँडर्स होता.
१९२९ च्या एप्रिल महिन्यात भगतसिंग आणि
बटुकेश्वर दत्त यांनी दिल्ली मध्ये मध्यवर्ती कायदेमंडळात बॉम्ब फेकला होता.
पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डीसप्युट बिल हे दोन विधेयक कायद्यात रूपांतर होऊ
नयेत म्हणून त्यांनी ही कृती केली होती.
भगतसिंग आणि त्यांच्या क्रांतिकारक सहकाऱ्यांनी जेलमध्ये ११६ दिवसांचे उपोषण केले होते.
भगतसिंग यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक ग्रंथ आणि आत्मचरित्र वाचले होते.
भगतसिंग यांना लिखाणाचीही आवड होती. त्यांचे खूप कमी लिखाण सध्या उपलब्ध आहे.
सरदार भगतसिंग यांचे विचार:
१) शोषणमुक्त समाजाची रचना असायला हवी
२) देशाच्या रचनेत धर्म किंवा जात हे आड येऊ नयेत
३) समाजवादी समाजरचना निर्माण करणे
४) अंधविश्वास आणि कर्मकांड मुक्त समाज निर्माण करणे
५) सामाजिक एकोपा असणारा आणि सर्वधर्मसमभाव असणारा समाज निर्माण करणे
६) राज्यकारभारात शेतकरी, कामगार आणि कष्टकरी यांना मोलाचे स्थान असणे.
ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन सॉन्डर्सच्या हत्येप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी सरदार भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवाराम राजगुरू या तिघा थोर क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली.
फाशीच्या वेळी भगतसिंग यांचे वय अवघे २३ वर्ष होते.
२३ मार्च देशभर शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.
शिवराम हरी राजगुरू
शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी झाला.
नाशिक तसेच काशीला त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये राजगुरू कार्यरत होते, त्याच दरम्यान त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला
हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंवर खूप विश्वास होता.
चंद्रशेखर आझाद यांनी 'हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन' च्या एका फितुराला ठार करण्याचे कार्य क्रांतिकारक शिव वर्मा आणि राजगुरूंवर सोपवले होते.
शिव वर्मा यांच्या पश्चात राजगुरूंनी एकट्याने त्या फितुराला दिल्ली मध्ये त्याच्या घराबाहेर ठार केले होते. इतकेच नाही तर दिल्लीहून पोलिसांना चकवून मथुरेला आले होते.
लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन'ने ब्रिटिश पोलिस अधीक्षक, जेम्स स्कॉट याला मारण्याचे नियोजन केले होते. १७ डिसेंबर, १९२८ रोजी भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्यास जेम्स स्कॉट समजून गोळ्या मारून ठार केले, परंतु तो ब्रिटिश पोलीस अधिकारी जेम्स स्कॉट नसून जॉन साँडर्स होता.
भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात बॉम्ब फेकल्यानंतर पोलिसांना आत्मसमर्पण केले होते. कालांतराने 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन'चे जवळपास सर्वच क्रांतिकारक पोलिसांना सापडले होते. फक्त चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू हे पोलिसांना सापडत नव्हते. १९२९ मध्ये राजगुरू पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात सापडले.
अशा या थोर क्रांतिकारकाला जॉन सॉन्डर्सच्या
हत्येप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी सरदार भगतसिंग आणि सुखदेव थापर यांच्या समवेत
फाशी देण्यात आली.
सुखदेव थापर
सुखदेव थापर यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी झाला होता.
'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' या संघटनेतून त्यांनी क्रांतिकारक लढा दिला.
नौजवान भारत सभेच्या स्थापनेत सुखदेव थापर यांचा सक्रिय सहभाग होता.
पंडित राम प्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद यांचा सुखदेव यांच्यावर प्रभाव होता.
सुखदेव यांनी सुद्धा जेलमध्ये भगतसिंग बरोबर ११६ दिवसांचे उपोषण केले होते.
ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन सॉन्डर्सच्या
हत्येप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी सरदार भगतसिंग, सुखदेव थापर आणि
शिवाराम राजगुरू या तिघा थोर क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली.
वरील तिन्ही थोर क्रांतिकारकांचा अभ्यास करण्यासाठी काही ग्रंथ/पुस्तके
इंग्रजी पुस्तके
Why I am an Atheist and Other Works By Bhagat Singh
Jail Diary and Other Writings By Bhagat Singh
Bhagat Singh: Select Speeches & Writings
The Execution of Bhagat Singh: Legal Heresies of the Raj
मराठी पुस्तके
Shahid Bhagat Singh : Biography Book Marathi
Shahid Bhagatsinh Samagra Vangmaya
धन्यवाद






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me Know.